एक्स्प्लोर

Ashadi Wari 2021 : आषाढी वारी पायी सोहळा रद्द केल्याने भाजप आक्रमक, कायदा सुव्यवस्था बिघडली तर सरकार जबाबदार असल्याचा इशारा

Pandharpur Ashadi Wari 2021 : आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं.

पुणे : पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. यावेळी आषाढी वारीबाबत पुण्यातील बैठकीत चर्चा झाली असून 10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर केलं. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, या निर्णयानंतर भाजपने याला विरोध केला आहे.

वारकऱ्यांना कोविडचे नियम पाळून परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सगळ्याच गोष्टींना परवानगी आणि वारीला मात्र विरोध हे न कळण्यासारखं आहे, अशी टीका त्यांनी केली. शरद पवार यांनी देखील आजारातून उठल्यावर हॉटेल चालकांची काळजी केली, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

निर्णयाला विरोध करणाऱ्यांना कोरोनाचं घेणेदेणे नाही : अजित पवार
सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना कोरोनाचं घेणेदेणे नाही. त्यांना राजकारण करायचं असेल तर आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. परंपरा टिकली पाहिजे पण कोरोनाने लोक ग्रासले नाही पाहिजे याचा सरकारने विचार केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पायी पालखी जाणार म्हणून वारकरी उत्साहात बाहेर पडतील म्हणून तशी परवानगी दिली नाही. आम्हाला तशी परवानगी द्यायला बरोबर वाटत नाही, पण कोरोना वाढला नाही पाहिजे. नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला. परंपरा टिकवण्यासाठी मधला मार्ग काढला असल्याचे उपमुख्यमंत्री सांगितले. दोन बसमध्ये 30-30 वारकऱ्यांना जाता येईल. एका पालखीसाठी दोन बस असतील, अशीही माहिती त्यांनी दिली.

Pandharpur Ashadi Wari 2021 : आषाढी वारी सोहळ्यासाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांनाच परवानगी, यंदाही पायी वारी सोहळा नाही : अजित पवार

भाजपची अध्यात्मिक आघाडी आक्रमक
निर्बंधासह पायी वारीची मागणी धुडकावल्यानं भाजपची अध्यात्मिक आघाडी आक्रमक झाली असून भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांची ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हे मुघलांचे सरकार असून महाराष्ट्रद्रोही सरकार आहे. ब्रिटीश, मुघलांच्या काळात ही पायी वारीची परंपरा खंडित झाली नाही ती या सरकारने केली असल्याची टीका त्यांनी केली. सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे, तो खपवून घेणार नाही. निर्बंधासह पायी वारीची परंपरा जोपासण्यावर वारकरी संप्रदाय ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार जबाबदार असल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला. 

नियमावलीमुळे पैठणच्या एकनाथ महाराज पालखीचे मानकरी रघुनाथ बुवा नाराज
मानाच्या पालखीत पैठणच्या पालखीचे स्थान आहे. शासनाने ठरवून दिलेले नियम बाबत पैठणच्या एकनाथ महाराज पालखीचे मानकरी रघुनाथ बुवा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  पायी पालखी जाणे हा वारकऱ्यांचा मान आहे, जीव आहे. त्यामुळे किमान पाच तरी लोकांना पायी पालखी नेऊ द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारचे नियम आम्हाला मान्य आहे. मात्र, जर पाच लोकांना पायी जाऊ दिलं तर वारकऱ्यांवर उपकार होतील असं महाराजाचे म्हणणे आहे. त्यामुळं शासनाने याचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केलीये.

मानाच्या 10 पालख्या :

1. संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)

2. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)

3. संत सोपान काका महाराज (सासवड)

4. संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)

5. संत तुकाराम महाराज (देहू)

6. संत नामदेव महाराज (पंढरपूर)

7. संत एकनाथ महाराज (पैठण)

8. रुक्मिणी माता (कौडानेपूर -अमरावती)

9. संत निळोबाराय (पिंपळनेर - पारनेर अहमदनगर)

10. संत चांगटेश्वर महाराज (सासवड)

दरम्यान, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी निर्बंधांमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. बस आणि भाविकांची संख्या दुप्पट करीत वारकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा बसमधून पालखी सोहळे अणावे लागणार असून यंदा फक्त 10 पालख्यांना 20 बस दिल्या जाणार आहेत. भाविकांची संख्या देखील दुप्पट करीत वारकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न प्रशासनानं केला आहे. याशिवाय विसाव्यापाशी होणारे प्रतिकत्मक रिंगण करून दिड किलोमीटर पायी  चालत येण्यास निर्बंध घालून परवानगी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंLok Sabha 2024 : महायुतीच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज, महायुतीचं जोरदार शक्तिप्रदर्शनVare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 25 April 2024Sangli : Chandrahar Patil यांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट, Nana Patole यांच्याकडून स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
Vidya Balan : मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
Mallikarjun Kharge on PM Modi : भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जु खरगेंकडून खोचक शब्दात पीएम मोदींना पत्र
भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जुन खरगेंचं खोचक शब्दात मोदींना पत्र
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
Mrunal Thakur On Freezing Eggs :  मृणाल ठाकूरने प्रेग्नेंसीबाबत घेतला मोठा निर्णय,  म्हणाली, योग्य जोडीदार मिळणं कठीण...
मृणाल ठाकूरने प्रेग्नेंसीबाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाली, योग्य जोडीदार मिळणं कठीण...
Embed widget