एक्स्प्लोर
Advertisement
रुग्णालयात बर्थ डे सेलिब्रेशन, 40 ते 50 जणांचा उच्छाद
40 ते 50 महाविद्यालयीन युवकांनी धूडगूस घालत रुग्णालयात वाढदिवस साजरा केला. सुरुवातीला या सर्वांनी रुग्णालय परिसरात केक कापला, पिपाण्या वाजवत उच्छाद मांडला.
पिंपरी : आजकाल वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती डोकेदुखी ठरु लागल्या आहेत. पिंपरी चिंचवडच्या महाविद्यालयीन तरुणांनी चक्क महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात जाऊन वाढदिवस साजर केला. या प्रकराने रुग्णालयातील रुग्ण भयभीत झाले आहेत. रविवारी रात्री घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
ज्या मित्राचा वाढदिवस होता, त्या मित्रावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. जवळपास 40 ते 50 महाविद्यालयीन युवकांनी धूडगूस घालत रुग्णालयात वाढदिवस साजरा केला. सुरुवातीला या सर्वांनी रुग्णालय परिसरात केक कापला, पिपाण्या वाजवत उच्छाद मांडला. त्यानंतर थेट रुग्णालयात घुसून आरडाओरडा करत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. पण त्यांच्या या सेलिब्रेशनमुळे शेकडो रुग्ण भयभीत झाले होते.
वायसीएम रुग्णालयाच्या सुरक्षा विभागाने तातडीने पिंपरी पोलिसांच्या कानावर ही बाब टाकली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालय गाठलं, परंतु तोपर्यंत अनेक जण पसार झाले होते. मात्र पोलिसांनी 24 तरुणांना ताब्यात घेतले. मात्र त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement