Lalit patil Drug Racket : कोण आहे ललित पाटील? नाशिकचा तरुण ड्रग्जच्या दुनियेत कसा आला?
ड्रग् माफिया ललित पाटील हा मुळचा नाशिकचा आहे. मात्र ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याने त्याची राज्यातीलच नाही तर विदेशात अनेक लोकांशी त्याची ओळख होती. 2020 मध्ये ललित पाटील ड्रग्जच्या रॅकेटमध्ये असल्याचं समोर आलं होतं.
पुणे : ड्रगमाफिया ललित पाटील हा श्रीलंकेत (Sasoon Hospital Drug Racket) पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ललित पाटील हा मुळचा नाशिकचा आहे. मात्र ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याने त्याची राज्यातीलच नाही तर विदेशात अनेक लोकांशी त्याची ओळख होती. 2020 मध्ये ललित पाटील ड्रग्जच्या रॅकेटमध्ये असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
ललित पाटीलला दोन मुलं...
ललित पाटीलचं बारावीपर्यंत शिक्षण झालं आहे. तो मुळचा नाशिकचा आहे. त्यांच्या कुटुबात त्याचे आई वडिल, भाऊ, पत्नी आणि दोन मुलं आहे. ललित पाटीलची पहिली पत्नी त्याला सोडून गेली त्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं होतं. मात्र दुसऱ्य़ा पत्नीचं अपघातात निधन झालं. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा आठव्या वर्गात शिकतो तर मुलगी नववीत शिकत आहे. या ड्रग्ज प्रकरणात त्याचा भाऊ भूषण पाटील देखील सहभागी होता. त्याला पुणे पोलिसांनी नाशिकमधून याच ड्रग्ज रॅकेटसाठी अटक करण्यात आली आहे. भूषण भूषणचं लग्न झालंय. भूषणची पत्नी गरोदर आहे, अशी माहिती भूषण आणि ललितच्या आईने दिलीये. तर भूषणचे वडील हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. युनायटेड इन्शुरन्स मध्ये ते कामाला होते.
वाईन कंपनी ते ड्रग्ज रॅकेट...
ललित आधी वाईन कंपनीत कामाला होता. नंतर तीन ते चार वर्षे ललित परदेशी शेळी बोकड विक्रीचा व्यवसाय करत होता. तसेच टेलिफोन एक्सचेंजमध्ये देखील काम करत होता, अशी माहिती ललित पाटीलच्या आईने दिली. 2020 मध्ये समीर वानखेडे यांनी पालघरमध्ये ड्रग्ज रॅकेटवर छापा टाकला होता. त्यावेळी छोटा राजनचे साथीदार अरविंद कुमार लोहारे आणि राकेश खानिवडेकर या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन मिळवण्यासाठी ललित पाटीलने मदत केली होती. मात्र त्यानंतर अरविंद कुमार लोहारे आणि राकेश खानिवडेकर या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली. तेव्हा या दोघांचा तपास सुरु असताना ललित पाटीलचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या तीन वर्षांपैकी 16 महिने ललित पाटील उपचारांचे कारण देऊन ससून रुग्णालयात ठाण मांडून होता. ज्या 16 नंबर वॉर्ड भोवती 24 तास पोलिसांचा खडा पाहरा असतो तिथपर्यंत मेफेड्रॉन आरामात पोहचत होता आणि ललित पाटील बसल्या जागी लाखों रुपयांचे व्यवहार करत होता. ललित पाटीलचा दुसरा अड्डा ससून हॉस्पिटलपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेलं पंचतारांकित हॉटेल होता.
वेगवेगळी कारणं देत ससूनमध्ये ठाण
त्यानंतर वेगवेगळ्या आजाराची कारणं देत ससून रुग्णालयात ठान मांडून होता. कधी त्याला टीबी झाल्याचं, कधी पोटात अल्सर झाल्याचं तर कधी त्याच हर्नियाच ऑपरेशन करण्याची गरज असल्याचा अहवाल ससूनच्या डॉक्तरांनी दिला होता. मात्र एक्स रे काढायच्या बहाण्याने वॉर्ड नं. 16 मधून बाहेर पडला आणि थेट पसार झाला.
इतर महत्वाची बातमी-