Pune : धक्कादायक! शिकवणीसाठी घरी येणार्या शिक्षिकेचे बाथरुममध्ये मोबाईल लपवून चित्रीकरण; 16 वर्षाच्या मुलाविरुद्ध तक्रार
Pune Crime News Update : शिकवणीसाठी (Tuition Classes) घरी येणार्या शिक्षिकेचे बाथरुममधे (Bathroom) मोबाईल लपवून 16 वर्षाच्या मुलाने चित्रिकरण करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.
![Pune : धक्कादायक! शिकवणीसाठी घरी येणार्या शिक्षिकेचे बाथरुममध्ये मोबाईल लपवून चित्रीकरण; 16 वर्षाच्या मुलाविरुद्ध तक्रार Pune Crime News Update Shooting of teacher coming home for teaching, hiding mobile phone in bathroom; Complaint against a 16-year-old boy Pune : धक्कादायक! शिकवणीसाठी घरी येणार्या शिक्षिकेचे बाथरुममध्ये मोबाईल लपवून चित्रीकरण; 16 वर्षाच्या मुलाविरुद्ध तक्रार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/02/412a9d54bee7dad0bfe6ee8377e0167c_7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Crime News : शिकवणीसाठी (Tuetion Classes) घरी येणार्या शिक्षिकेचे बाथरुममधे (Bathroom) मोबाईल लपवून 16 वर्षाच्या मुलाने चित्रिकरण करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. हा मुलगा सध्या दहावीत शिकत असून त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी मागील पाच वर्षांपासून इंग्रजी विषयाची खाजगी शिकवणी लावली होती. मुलगा 10-11 वर्षाचा असल्यापासून सदर शिक्षिका या मुलाला इंग्रजी शिकवते.
त्यासाठी ही शिक्षिका कोथरुडमधील त्याच्या घरी त्याला शिकवायला जात होती. काल ही शिक्षिका त्याच्या घरातील बाथरुमचा वापर करण्यासाठी गेली असता आतमधील साबणाच्या खोक्याच्या मागे काहीतरी चमकताना या शिक्षिकेला दिसले. साबणाचे खोके बाजूला केले असता त्या पाठीमागे मोबाईल लपवला असल्याचे आणि त्यामध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग होत असल्याचे या शिक्षिकेला आढळून आले.
त्यानंतर ही शिक्षिका मोबाईल घरी घेऊन गेली आणि तिने मोबाईल तपासला असता. त्यात जे काही दिसलं त्यानंतर या शिक्षिकेला हादराच बसला. त्यामध्ये तिचे याआधी बाथरुममध्ये केले गेलेले चित्रीकरण आढळून आले. त्याचबरोबर इतर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ देखील त्या मोबाईलमध्ये आढळून आले.
त्यानंतर या महिला शिक्षिकेने पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर पोलीसांनी आय टी एक्ट नुसार या मुलाच्या विरुद्ध गुन्हा नोंद केलाय. या मुलाला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहेत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi : छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! अजिंक्य शंभूराजांचा पराक्रमी इतिहास
- Covid19 Restrictions : आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त; दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका, मास्क सक्ती नाही
- Viral Video : समुद्रात पोहताना महिलेच्या कानात शिरला खेकडा, पुढे काय झालं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)