एक्स्प्लोर

Pune News: 20 दिवसांपूर्वी साखरपुडा, 30 व्या वर्षी गळ्याला दोरी, तुकाराम महाराजांच्या वंशजाने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

Pune Dehu News: तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचं टोकाचं पाऊल, हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून देहूतील घरात आयुष्य संपवलं. देहूनगरीत एकच खळबळ उडाली आहे.

पुणे: संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरीष महाराज मोरे (Shirish More) यांनी देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिरीष महाराजांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. याबाबत अद्याप अधिकची माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, आज सकाळी बराचवेळ होऊनही त्यांनी दार उघडले नव्हते. दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास लावून घेतला. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

शिरीष महाराज मोरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. शिरीष महाराज यांनी खोलीत एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. 20 दिवसांपूर्वीच शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता.  नुकताच त्यांचा टिळा झाला होता. 20 फेब्रुवारीला रोजी मोरे यांचा विवाह होणार होता. ते उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. मात्र, यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शिरीष महाराज मोरे हे अवघ्या 30 वर्षांचे होते. पुढील काही महिन्यांमध्ये त्यांचे लग्न होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. तुकाराम महाराजांचे (Sant Tukaram Maharaj) वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येच्या बातमीने देहूनगरीत एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचेनेतून त्यांनी आत्महत्येचे केल्याचे कळत असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नितेश राणेंची पोस्ट

राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी शिरीष महाराज मोरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. संत तुकाराम महाराजांचे वंशज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मित निधन झाले. मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सदगती मिळो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली, असे नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

आणखी वाचा

मोठी बातमी: तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचं टोकाचं पाऊल, हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून देहूतील घरात आयुष्य संपवलं

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
Embed widget