Viral Video : समुद्रात पोहताना महिलेच्या कानात शिरला खेकडा, पुढे काय झालं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेच्या कानातून एक खेकडा बाहेर पडताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी चांगलेच थक्क झाले आहेत.
Viral Video : बहुतेक लोकांना त्यांची सुट्टी समुद्राजवळील काही समुद्र किनाऱ्यावर घालवायला आवडते. यावेळी अनेक लोक समुद्राच्या पाण्यात मजा, मस्ती करताना दिसतात. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये समुद्राच्या पाण्यातील मज्जा तुमच्या जिव्हारी बेतू शकते याची आठवण करुन देतो.
सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एका महिलेच्या कानातून अशी विचित्र गोष्ट बाहेर पडताना दिसत आहे. जर ही गोष्ट योग्य वेळी कानाबाहेर आली नसती तर महिलेला आयुष्यभरासाठी बहिरेपणा येण्याची शक्यता होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महिलेच्या कानातून एक खेकडा बाहेर पडताना दिसत आहे, जो समुद्रात स्नॉर्कलिंगसाठी गेलेल्या महिलेच्या कानात अचानक घुसला.
महिलेच्या कानाला आपले घर बनवणाऱ्या खेकड्याचा आकार खूपच कमी असला तरी कानात घुसल्यानंतर तो बरेच नुकसान देऊ शकतो. त्यामुळे महिलेला बहिरेपणा येण्याची शक्यता होती. हा व्हिडीओ आधी टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता, जिथे त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर हा व्हिडीओ यूट्यूबवरही शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती महिलेच्या कानातून खेकडा काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पुरुष चिमट्याचा वापर करून महिलेच्या कानातला खेकडा काढताना दिसतो. त्याचवेळी कानातून खेकडा बाहेर येत असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यूजर्स व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi : छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! अजिंक्य शंभूराजांचा पराक्रमी इतिहास
- Covid19 Restrictions : आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त; दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका, मास्क सक्ती नाही
- 1 एप्रिलपासून बँकेचे नियम बदलणार, औषधं महागणार, जीएसटीतही बदल; जाणून घ्या काय आहेत 10 मोठे बदल
- PM Modi : 'परीक्षा पे चर्चा', पंतप्रधान मोदी साधणार 1 हजार विद्यार्थ्यांशी संवाद, परीक्षेच्या काळात तणावमुक्त होण्यावर चर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha