एक्स्प्लोर

Pune Accident: अपघातानंतर शिवीगाळ करणारं रॅप व्हायरल, पण तो व्हिडीओ बिल्डरपुत्राचा नाही, पोलिसांचा दावा, आईही ढसाढसा रडली!

Pune Viral Video : गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाल आणि पुन्हा त्या रॅप साँगने आणखी वातावरण तापवलं. हा व्हिडीओ पुणे अपघात प्रकरणतील लाडोबा असल्याचे  म्हणत सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.

पुणे :  कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात (Pune Accident News)  रोज नवे अपडेट येत आहे. पुणे अपघाताविषयी लोकांच्या मनात प्रचंड राग, संताप आहे. दरम्यान गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाल आणि पुन्हा त्या रॅप साँगने आणखी वातावरण तापवलं. हा व्हिडीओ पुणे अपघात प्रकरणतील लाडोबा असल्याचे  म्हणत सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. मात्र काही वेळातच हे शिवीगाळ करणारं रॅप बिल्डरपुत्राचे नसल्याचा दावा पोलिसांनी केला. तर लेकाच्या बचावासाठी आईने पहिल्यांदा पुढे येत  रॅप साँग मुलाचे  नसल्याचं म्हटलं आहे.

धनिकपुत्राला बाल हक्क न्यायालयाने 14 दिवसांसाठी बालसुधारगृहामध्ये पाठवलं आहे. त्याचे वडील विशाल अग्रवालला  पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. तर आजोबा सुरेंद्र अग्रवाल  याची देखील काल चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर एका रॅप साँगने वातावरण तापवलं होतं. या व्हिडीओतील तरुण अर्वाच्च भाषेत बोलताना दिसला.इतकंच नाहीतर त्याने शिवीगाळही केली. तो मुलगा अल्पवयीन आणि त्याचे देहबोली बिल्डरपुत्रासारखी  असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तो व्हिडीओमधील तरूण बिल्डर पुत्र असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरलं. अशातच यावर वेदांतची आई शिवानी अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया देत ते रॅप साँग वेदांतचं नसल्याचं म्हटलं आहे. 

व्हायरल व्हिडीओवर बिल्डरपुत्राची आई म्हणाली... 

अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांनी स्पष्टीकरण देत एक व्हिडीओ केला. हा माझा मुलगा नसून  मुलाचा व्हिडीओ फेक असल्याचं म्हणत शिवानी अग्रवाल यांनी पोलिसांना विनंती केली. यावेळी बोलताना बिल्डरपुत्राची आई ढसाढसा रडली. बिल्डरपुत्राची आई म्हणाली, मी मीडियाला विनंती करते की, व्हायरल होत असलेला व्हिडीओ तो माझ्या लेकाचा नाही. तो फेक व्हिडीओ आहे. माझा मुलगा रिमांड होममध्ये आहे. मी पोलीस कमिशनरांना विनंती करते की, त्याला प्रोटेक्ट करा,  प्लीज माझ्या मुलाला वाचवा... 

व्हिडीओ फेक आहे : पुणे पोलीस आयुक्त

तर आज पुणे  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील याचा खुलासा केला आहे.अमितश कुमार म्हणाले,  व्हिडीओ फेक आहेत. कुणी तयार केलेत ते तपासले आहेत.  अल्पवयीन आरोपीने तयार केलेले नाही. या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे.    

Viral Video :

 

हे ही वाचा :

लाडोबाचे लाड करती कोण? बाप कोर्टात म्हणाला,मी चावी देऊन चूक केली, आता आजोबा म्हणतात, मीच पोर्शेची चावी आणि क्रेडिट कार्ड दिलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget