(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lalit Patil Drug Case : ससून रुग्णालयाला ललित पाटीलची धास्ती? हर्नियावर उपचार सुरु मात्र दाखल करुन घेण्यास ससूनचा नकार
ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil Drug Case) याला दाखल करण्यास आता ससून रुग्णालयाचा नकार देत आहे. ड्रग्स तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालय प्रशासन आता दाखल करून घ्यायला तयार नाहीत
पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil Drug Case) याला दाखल करण्यास आता ससून रुग्णालयाचा नकार देत आहे. ड्रग्स तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालय प्रशासन आता दाखल करून घ्यायला तयार नाहीत. ललित पाटील याला सध्या हर्नियाचा त्रास सुरु झाला आहे. मात्र ससून प्रशासन त्याला दाखल करुन घेण्यास तयार नाही. दररोज येऊन उपचार घेऊन ललित पाटीलला परत पाठवले जात आहे. ललित पाटील प्रकरणाची ससून रुग्णालयात धास्ती घेतल्याचं दिसत आहे. ललित पाटील पळून गेल्यानंतर संशयाची सुई ससून रुग्णालयातील अधिकारी आणि डॉक्टरांवर वळली होती. त्यानंतर आता ललित पाटीलवर डॉक्टर उपचार करत आहे मात्र त्याला भर्ती करुन घेत नाही आहेत.
ससून रुग्णालयाला ललित पाटीलची धास्ती?
ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर डॉक्टर आणि पोलिसांवर संशय होता. त्यानंतर या दोघांनीही ललित पाटीलला मदत केल्याचं पुढे आलं. त्यानंतर अनेक जणांवर संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी दोन पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं. ससून रुग्णालयातील डीन संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आलं आणि डॉ. देवकाते यांना निलंबित करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणानंतर आता ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात भर्ती करुन घेत नाही आहे. त्याच्यावर उपचार करुन त्याला परत पाठवण्यात येत आहे.
3 तासांनी कंट्रोल रुमला माहिती दिली....
ललित पाटील प्रकरणात अनेक खुलासे आता समोर येत आहे. पोलीस, डॉक्टर यांनी मदत केल्यानंतर कारागृह प्रशाससनाने त्याला मदत केल्याचं उघड झालं आहे. मात्र यात सर्वात मोठी माहिती आता समोर आली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर 3 तासांनी ही माहिली कंट्रोल रुमला प्राप्त झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ललित पाटील चा पोलिसांनी शोध घेऊ नये म्हणून पोलीस नाईक नाथा काळे आणि अमित जाधवने ललित पळून गेला म्हणून कळवलेच नसल्याचं उघड झालं आहे.
... तर यंत्रणा सज्ज झाली असती!
2 ऑक्टोबर रोजी ललित ससून रुग्णालयामधून पळाला. त्यानंतर तब्बल तीन तास कंट्रोल रुमला ही माहिती दोन पोलिसांनी कळवलीच नव्हती. ललित पाटील पळाल्याची माहिती. उशिरा माहिती प्राप्त झाल्यामुळे पोलीस यंत्रणा वेळीच सतर्क होऊ शकली नाही. यावरुन काळे आणि जाधव यांनी मुख्य आरोपी ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याचे निष्पन्न झालं आहे. ललित पळून गेल्यानंतर पोलिस त्याचा शोध घेवू नयेत, या उद्देशाने त्यांनी ही बाब तीन तासानंतर पोलिस नियंत्रण कक्षात कळवली होती.
इतर महत्वाची माहिती-