Pune Leopard : पुरंदरमधील पिंगोरी गावात बिबट्याचा वावर; नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण
बिबट्याच्या वावरमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत बिबट्याने माणसावर हल्ला केला नाही आहे. मात्र शेळी बकरी या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.
Pune Leopard : पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात बिबट्याचा वावर असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. पिंगोरी हे गाव पुरंदर तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. त्यामुळे या गावात डोंगरामुळे बिबट्याचा वावर या नेहमीचाच झाला आहे.
काल रात्री 1 च्या दरम्यान हा बिबट्या रस्त्यावरुन जाताना रुपेश यादव यांना दिसला. तोपर्यंत तो बिबट्या रस्त्यालगत असलेल्या झाडीत जाऊन बसला. झुडपात बसलेल्या बिबट्याचा रुपेश यादव यांनी गाडीतून हा व्हिडीओ काढला आहे. बिबट्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत बिबट्याने माणसावर हल्ला केला नाही आहे. मात्र शेळी बकरी या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र या गावात अजूनही मोबाईलला रेंज नाही. त्यामुळे जरी कोणता आपत्कालीन प्रसंग आला तर मोबाईलला रेंज नसल्याने गावकऱ्यांनी संपर्क कोणाला करायचा, असा प्रश्न निर्माण होतो.
फोन असतो पण मोबाईलला रेंज नसल्या कारणाने फोन असून पण उपयोग होत नाही, अशी स्थिती गावकऱ्यांची आहे. गावकऱ्यांनी गावात टॉवर लावावा अशी मागणी केली मात्र प्रशासनाने टॉवरची सोय केली नसल्याचे गावकरी सांगतात. बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली.
पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. अनेक कारणांमुळे वन्यप्राणी गावात किंवा शहरी भागात शिरतात. त्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लगातो. अनेकदा परिसरात भीतीचं वातावरणसुद्धा निर्माण होतं. अनेकदा नागरीकांवर हल्ले देखील होतात. मात्र याकडे वनवीभागाचं लक्ष नसल्याचं चित्र कायम बघायला मिळतं.
बारामतीतील सुप्यात रानगव्याचा वावर
पश्चिम घाटातील रानगवा बारामतीतील सुप्यात दिसल्यामुळे काही दिवसांपुर्वी आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. गवा हा मोठ्या प्राणी असल्याने नागरीकांवर हल्ल्याची भीती असते. रानगवा कोणावर हल्ला करत नाही, तो लाजाळू प्राणी असतो, असं प्राणी अभ्यासक सांगतात.