एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंच्या गट प्रमुखाने संदीप देशपांडेंसमोर शिवबंधन काढलं अन् ऑन द स्पॉट केला मनसेत प्रवेश

Sandeep Deshpande and Thackeray Group, मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेत असतानाच मोठा निर्णय घेतला.

Sandeep Deshpande and Thackeray Group, मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेत असतानाच मोठा निर्णय घेतला. ठाकरेंच्या गट प्रमुखाने संदीप देशपांडे यांच्यासमोर शिवबंधन हातातून काढले आणि ऑन द स्पॉट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेत प्रवेश केला. 

निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले

मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. संदीप देशपांडे विरुद्ध  ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अशी लढत वरळीमध्ये पाहायला मिळणार आहे. संदीप देशपांडे यांनी वरळीमध्ये गाठी भेटींना सुरुवात केली आहे. देशपांडे यांच्याकडून वरळीकरांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. या सगळ्या गाठी भेटीच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले आणि मनसेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसापासून वरळीमधले राजकीय वातावरण तापले आहे. जांभोरी मैदान येथे ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले होते . त्यामुळे आगामी काळामध्ये वरळीमध्ये मनसे विरुद्ध ठाकरेंचे शिवसेना ही  विधानसभेची लढत चांगलीच चर्चेत राहणार आहे.

मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये संघर्ष पेटला 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या सैनिकांमध्ये मोठा वाद पाहायला मिळालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ते शिवसैनिक होते, पण आम्ही या हल्ल्याचं समर्थन करत नाही असं म्हटलं होतं. मात्र, यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. उद्धव ठाकरे ठाण्यातील मेळाव्यासाठी जात असताना त्यांच्या कारवर शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या. शिवाय ठाकरे ज्या कार्यलयात मेळावा घेणार होते, त्या कार्यालयातही मनसैनिक घुसले आणि त्यांनी राडा केला होता. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Jayant Patil : अजितदादा म्हणाले जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्डामध्ये विचार होणार, जयंत पाटील म्हणाले, अजित पवार म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget