Jayant Patil : अजितदादा म्हणाले जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्डामध्ये विचार होणार, जयंत पाटील म्हणाले, अजित पवार म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड
Jayant Patil on Ajit Pawar, बीड : बारामती (Baramati) आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील नेत्यांकडून वक्तव्य केली जात आहेत.
Jayant Patil on Ajit Pawar, बीड : बारामती (Baramati) आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील नेत्यांकडून वक्तव्य केली जात आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बुधवारी मोठा दावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) माझ्याविरोधात कर्जत जामखेडमधून लढू शकतात, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर अजित पवार यांचे पुत्र बारामती विधानसभा मतदारसंघातून लढतील अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. कार्यकर्त्यांची आणि जनतेची इच्छा असेल तर जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्डामध्ये विचार होणार, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील काय काय म्हणाले?
बारामतीमधून जय पवार निवडणूक लढणार का? यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे नेमकं कोण अजितदादा हेच पार्लमेंटरी बोर्ड आहेत. त्यांच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये इतर कोणी आहे हे मला तरी माहीत नाही. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढण्यात रस नाही म्हटले. याची नेमकी कोणती कारण आहेत, ते मलाही माहित नाही. काय इच्छा आहे त्यांचं काय धोरण आहे? इतक्या लवकर तेव्हा टिपणी करणे योग्य नाही.
जाहिरातीसाठी सरकारने 280 कोटी बाजूला काढून ठेवले
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, मोठे मोठे कॉट्रॅक्ट काढायचे आणि त्यातून मलिदा खायची योजना हे सरकार राबवत आहे. आता अर्थमंत्री म्हणत आहेत की मी आता बघितल्या शिवाय सही करणार नाही. आता त्यांच्या लक्षात आले के हे कुठे ही सह्या घेतात. कोणते ही सरकार आले तरी चालू योजना बंद करणार नाहीत. जाहिरातीसाठी सरकारने 280 कोटी बाजूला काढून ठेवले आहेत. पेपर उघडला की एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दिसतात. कारण दोन महिन्यात 280 कोटी रुपये खर्च करायचे आहेत. आता सरकारने योजना दुत नेमल्या आहेत. 300 कोटी या योजना दुत लोकांसाठी सरकारने राखून ठेवले आहेत. खुर्ची वाचवण्यासाठी हे सरकार काहीही करेल. तुम्ही म्हणा चंद्र पाहिजे ते म्हणतील दोन महिन्यात देतो.
इतर महत्वाच्या बातम्या