Nitin Gadkari PM Offer: नितीन गडकरींच्या मनात पंतप्रधानपदाची अभिलाषा, त्यांनी थेट नरेंद्र मोदींना मेसेज दिलाय; ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
Nitin Gadkari on PM Post: नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदाची ऑफर नाकारल्याचे स्पष्ट केले असले तरी यामुळे राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्रातही पुन्हा एकदा गडकरींच्या नावाची चर्चा सुरु होऊ शकते. 2
मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या मनातील पंतप्रधानपदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त करुन नरेंद्र मोदी यांना थेट संदेश दिला आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केले आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शनिवारी नागपूरमधील एका कार्यक्रमात आपल्याला विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधानपदाची (PM) ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला होता.
या पार्श्वभूमीवर प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करुन म्हटले की, नितीन गडकरी यांनी त्यांच्या मनातील सर्वोच्च पदावर बसण्याची इच्छा बोलून दाखवली. हे सांगताना नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षातील नेत्याकडून (Oppostion Party) आपल्याला पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले. पण हा नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेला थेट संदेश आहे. इंडिया आघाडीत (INDIA Alliance) देशाचे नेतृत्त्व करण्यासाठी अनेक सक्षम नेते आहेत. त्यामुळे आम्हाला पंतप्रधानपदासाठी भाजपमधून (BJP) कोणत्याही नेता उसना घ्यावा लागणार नाही. मात्र, नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षाच्या नावाने पंतप्रधानपदावर दावा सांगून अगदी योग्य खेळी खेळली आहे, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Nitin Gadkari ji is expressing his heartfelt desire to be on the top chair, using the excuse of opposition parties he is sending a message to Modiji. INDIA alliance has very capable leaders who can lead the country, wouldn’t want to borrow one from BJP.
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) September 15, 2024
Well played Nitin ji
नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?
नितीन गडकरी यांनी नागपूरमधील या कार्यक्रमात आपल्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत राजकीय फटकेबाजी केली. त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एक घटना अचानक घडली. मी या घटनेमधील नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? मी संबंधित नेत्याला स्पष्टपणे सांगितले की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारण करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.
आणखी वाचा
स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसता: नितीन गडकरी
मला विरोधी पक्षातील नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण... नितीन गडकरींचा गौप्यस्फोट