एक्स्प्लोर

भाजपच्या उज्वल भविष्याकरता नितीन गडकरी मैदानात, महायुतीचे सरकार आणण्याकरता महिनाभर वेळ देणार: चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : भाजपच्या उज्वल भविष्याकरता, महायुतीचे सरकार आणण्याकरता नितीनजी पूर्ण एक महिना देणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Maharashtra Politics नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) संपूर्ण महाराष्ट्र हृदयापासून ओळखतो, त्यांच्यावर प्रेम करतो. विधानसभेत भाजपच्या विजयकरता ते आता पूर्ण ताकदीनिशी उतरतील. नितीनजींना मानणारा एक मोठा वर्ग आहे. नितीन गडकरी आमचे बडे नेते आहे. कोर ग्रुपचे प्राईम मेंबर आणि पार्लमेंटरी बोर्डचे देखील ते मेंबर आहे. परिणामी,  भाजपाच्या उज्वल भविष्याकरता, महायुतीचे सरकार आणण्याकरता नितीनजी पूर्ण एक महिना देणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. ते नागपूर (Nagpur News) विमानतळावर आले असता ते बोलत होते.  

आगामी विधानासभेच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने भाजपचं मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. भाजपच्या वतीने पक्षातील चार दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) या चार नेत्यांवर विधानासभेसाठीची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, येत्या आठवड्याभरात 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार आहेत. तर अनेक भाजपचे नेते यांचा यात समावेश असणार आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

आम्हाला मुख्यमंत्रीपदाची घाई नाही,  उद्धव ठाकरे त्यासाठी रुसून बसले आहेत

राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहे. पुढच्या काळात आमचं केंद्र नेतृत्व आणि राज्याचे तिन्ही नेते हे बसून महायुतीतील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण या संदर्भात निर्णय घेतील. आम्हाला मुख्यमंत्रीपदाची घाई नाही. किंबहुना महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे रुसून बसले आहेत. त्यासाठी ते दिल्लीला गेले होते. दोन दिवस काँग्रेस नेत्याच्या घरी जाऊन बसले, शरद पवारांकडे जाऊन आले. मात्र, त्यांचं नाव कोणी जाहीर करायला तयार नाही. त्यामुळे ते काल राहुल गांधीच्या सांगलीतील कार्यक्रमाला गेले नाही. याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चेहरा मान्य करायला तयार नाही. लोकसभेत त्यांचा चेहरा पुढे करून सहानुभूती मिळवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,  उद्धव ठाकरे यांना पुढे करायला तयार नाही. अशी घणाघाती टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Bonde on Rahul Gandhi over his statement on reservation in IndiaSpecial Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यSpecial Report On Women CM : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? चर्चेत कुणाची नावं?ABP Majha Headlines : 11 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
Nashik Crime : बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
Embed widget