एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

भाजप पदाधिकाऱ्यांची सेनेच्या निर्धार मेळाव्याला दांडी, गुलाबराव पाटील संतापले, थेट फडणवीस, महाजन अन् शिंदेंकडे तक्रार करणार

Gulabrao Patil : पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेनेच्यावतीनं निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली होती.

जळगाव: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. जळगाव जिल्ह्यात महायुतीमधील घटकपक्षांमध्ये आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्यावतीनं "निर्धार मेळावा" आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. याच मुद्यावरुन शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेळाव्यामध्ये जे घडलं ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्याकडे मांडणार असल्याचं ते म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीपूर्वीच पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजप शिवसेनेत दुरावा असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. पाचोरा येथे आयोजित शिंदे सेनेच्या निर्धार मेळाव्याला भाजप पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देवून ही त्यांनी गैर हजेरी लावल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केली आहे.

गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात बोलताना भूमिका मांडली. भाजप पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर भाषणात देखील बोललो आहे. आजच्या मेळाव्या मधे जे घडलं, त्या गोष्टी मी  देवेंद्र फडणीस,गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या कडे मांडणार आहे, असही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. 

युतीत अशा गोष्टी नको, याचा परिणाम महाराष्ट्रावर

युतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये ,याचा परिणाम हा संपूर्ण महाराष्ट्रावर होईल, असा इशारा देखील गुलाबराव पाटील यांनी दिला.  

मंगळवारी मुंबईत कॅबिनेट बैठक होणार आहे. त्या बैठकीत हा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हा प्रकार आम्ही मांडणार आहोत, असं गुलाबराव पाटील म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत आपण एक संघ होतो म्हणून देशात विपरीत वातावरण असताना सुद्धा जळगाव जिल्ह्यात दोन्ही जागा आपल्या निवडून आल्या आहेत, अशी आठवण देखील गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांना करुन दिली. 

लोकसभेप्रमाणं जर आपण विधानसभेत एकसंध राहिलो तर जळगाव जिल्ह्यातील 11 ते 11 जागा निवडून येऊ शकतात, असंही पाटील म्हणाले.  मात्र, आपल्यात फूट असणं हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे आहे,  असा इशारा देखील पाटील यांनी दिला.  

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये दिलजमाई होणार का हे येत्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल. 

इतर बातम्या :

ज्या शंकरराव पाटलांना पवारांनी दोनवेळा चितपट केलं, त्यांच्याच पुतण्याच्या हाती 'तुतारी'; इंदापुरातील पवार-पाटील संघर्षाचं वर्तुळ पूर्ण

महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Haryana Election Result : हरियाणात भाजपची  हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोषSupriya Sule on Haryana : हरियाणात भाजपची आघाडी; सुळे म्हणाल्या 4 पर्यंत थांबा ABP MAJHAJammu Kashmir Election : जम्मू-काश्मिरच्या निवडणुकीत फुटीरतावादी नेत्यांना मतदान? खास चर्चाABP Majha Headlines : 04 PM : 06 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
Haryana Election: काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
Haryana Election Results 2024 : हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
मुलगी शिकली प्रगती झाली,पण काम नाही म्हणून 1500 देऊन घरी बसवली; ठाकरेंचा घणाघात
मुलगी शिकली प्रगती झाली,पण काम नाही म्हणून 1500 देऊन घरी बसवली; ठाकरेंचा घणाघात
Embed widget