पेट्रोल-डिझेलचे दर 50 रुपयांच्या खाली आणण्यासाठी भाजपचा पराभव आवश्यक : संजय राऊत
Shiv Sena On BJP: शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर सरकारने पेट्रोलचे दर पाच रुपयांनी कमी केले. महागाईने जनता हैराण झाली आहे.
![पेट्रोल-डिझेलचे दर 50 रुपयांच्या खाली आणण्यासाठी भाजपचा पराभव आवश्यक : संजय राऊत Shiv Sena leader Sanjay Raut told that BJP has to be completely defeated to bring down the price of petrol, diesel more पेट्रोल-डिझेलचे दर 50 रुपयांच्या खाली आणण्यासाठी भाजपचा पराभव आवश्यक : संजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/01/7294b099560a74b6d0a8dda4efaab8f3_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shiv Sena On BJP: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर शिवसेनेचे वरीष्ठ नेते संजय राऊत यांनी गुरुवारी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, पेट्रोलियम पदार्थांच्या किमती 50 रुपयांच्या खाली आणायच्या असतील तर भाजपला पूर्णपणे पराभूत व्हावे लागेल. ते म्हणाले की, महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे.
संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की 100 रुपयांच्या वर इंधनाचे दरवाढ करण्यासाठी खूप कठोर व्हावे लागते. पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात 5 रुपयांनी कपात केली. त्यामुळे भाव 50 रुपयांच्या खाली आणायचे असेल तर भाजपला पूर्णपणे पराभूत व्हावे लागेल.
"महागाईमुळे सर्वसामान्य हैराण"
दिवाळी साजरी करण्यासाठी लोकांना कर्ज घ्यावे लागत असून महागाईमुळे सणासुदीचे वातावरण नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. विशेष म्हणजे महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने बुधवारी एक महत्त्वाचे पाऊल उचलले. इंधनाच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपयांची कपात केली.
ट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त
केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे 5 रुपये तर प्रति लिटर डिझेलमागे 10 रुपये कमी केले आहेत. त्यामुळे सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती आता अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने नागरिकांना एक प्रकारची दिवाळी भेट दिल्याची चर्चा सुरु आहे. पेट्रोल-डिझेलचे कमी झालेले दर हे आजपासून लागू झालेत. केंद्र सरकारने पेट्रोलवरच्या एक्साईज टॅक्समध्ये पाच रुपये तर डिझेसवरच्या एक्साईज टॅक्समध्ये 10 रुपये कमी केल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरल्या आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)