शरद पवार यांची राष्ट्रवादी किती जागांवर विधानसभा लढवणार? जयंत पाटलांनी भर सभेतच जाहीर केलं!
Jayant Patil on Assembly Election 2024: लोकसभेतील यशानंतर आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. अशातच लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
NCP in Maharashtra Assembly Election 2024: सांगली : राज्यात लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) वारं क्षमलं असून आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी (Maharashtra Assembly Elections 2024) पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं विधानसभेची तयारी सुरू केली आहे. उमेदवारांची चाचपणी, जागावाटप यासाठीही खलबतं सुरू झाली आहेत. लोकसभेप्रमाणेच (Lok Sabha) राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकही महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) अशीच होईल, असं एकंदरीत चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आगामी विधानसभेसाठी किती जागांवर आपले शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. यासाठी कारण ठरलंय, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा लढवणार, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
लोकसभेतील यशानंतर आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. अशातच लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी स्वबळावरही लढवण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. तर, दुसरीकडे लोकसभेत महाविकास आघाडीतील इतर पक्षांपेक्षा जास्त जागा मिळवल्यानं विधानसभेतही सर्वाधिक जागांसाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. अशातच शरद पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. पण हे वक्तव्य करताना जयंत पाटलांनी जागांचा आकडा मात्र गुलदस्त्यात ठेवल्याचं पाहायला मिळालं.
शरद पवारांची राष्ट्रवादी किती जागांवर निवडणूक लढवणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले की, "आता साडेतीन-चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. आम्ही सर्वच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल, असं वाटत नाही. त्यामुळे काय करायचंय ते तुम्हीच करायचं आहे. कारण लोकसभेत मी दहा मतदारसंघ फिरलो, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, फार प्रचंड काम केल्याशिवाय गडी दुरुस्त होत नाही." पुढे बोलताना जयंत पाटलांनी विधानसभेच्या जागांबाबचा आकडा घेणं टाळलं आणि म्हणाले की, आकाड घेतला तर टीव्हीवर सुरू होईल, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार, म्हणून मी आकडा घेत नाही.
महायुतीत 80 जागांवर राष्ट्रवादीचा दावा
राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणावर जागा लढवणार असल्याचं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं आहे. तर दुसरीकडे महायुतीतही विधानसभेच्या जागावाटपावरुन खलबतं सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विधानसभेसाठी 80 जागांवर दावा केला आहे. अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 80 जागांवर लढवण्याची तयारी असल्याचं म्हटलं होतं.
पाहा व्हिडीओ : Jayant Patil Sangli : सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सांगली लोकसभेत माझ्याबाबत समज-गैरसमज पसरले, पण आम्ही आघाडी धर्म पाळला; जयंत पाटलांनी मौन सोडलं