एक्स्प्लोर

Ashok Chavan Resignation: अशोक चव्हाण आता काँग्रेस पक्षावर दावा ठोकणार? संजय राऊतांचं ट्विट

Ashok Chavan: अशोक चव्हाण येत्या १५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.

मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन भाष्य केले. आता अशोक चव्हाणही (Ashok Chavan) काँग्रेस आमदारांचा गट फोडून संपूर्ण पक्ष आणि हात या चिन्हावर दावा करणार का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते. चर्चा करीत होते, आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाणसुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?   आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट फोडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्या ताब्यात घेतले होते. तर काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा गट फोडून संपूर्ण पक्ष आणि घड्याळ चिन्ह हस्तगत केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. 


अशोक चव्हाणांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का

अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून असल्याचे सांगितले जाते. भाजप पक्षश्रेष्ठींनी अशोक चव्हाण यांना राज्यसभेच्या उमेदवारीची ऑफर दिल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण ज्यावेळी भाजपमध्ये प्रवेश करतील त्यावेळी त्यांच्यासोबत मराठवाडा आणि मुंबईतील काही काँग्रेस आमदारही असतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी सात ते आठ आमदार काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देतील, अशी चर्चा आहे. 

राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांचं पहिलं ट्विट

आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे, असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आणखी वाचा

अशोक चव्हाणांनी काँग्रेस आणि आमदारकीही सोडली, राजीनामापत्र 'माझा'कडे, भाजप प्रवेशावर शिक्का!

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
Nagpur MLC Election 2026: नागपूरच्या मतमोजणीत जबरदस्त ट्विस्ट; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, दिग्गजांच्या लढतीत कराळे मास्तर जायंट किलर ठरणार?
नागपूरच्या मतमोजणीत जबरदस्त ट्विस्ट; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, दिग्गजांच्या लढतीत कराळे मास्तर जायंट किलर ठरणार?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
Embed widget