''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांनी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीची पहिली सभा अकोले तालुक्यात पार पडली
![''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण Sanjay raut heavy critics on amit shah with say you are student of my school where i am head master ''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/529abbfea911d988001ce3da91980fd117141483409891002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : देशाच्या लढ्यात महाराष्ट्र सदैव पुढे असतो म्हणूनच मोदी शहा महाराष्ट्राला घाबरतात. मात्र, त्यांची सत्ता उलथून टाकण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. इथे एकदा ठिणगी पडली की वणवा भडकतो, आता तर मशाल पेटलीय असे म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपा नेत्यांवर आणि केंद्रातील मोदी सरकावर जोरदार हल्लबोल केला. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. अमित शहा, (Amit Shah) तुम जीस स्कूल मे पढते हो.. मै उसका हेडमास्टर हुं... मराठी माणसाला राष्ट्रभक्ती, हिंदुत्व, संघर्ष शिकवू नका. तुम्ही सगळे आयत्या बिळावर बसलेले नागोबा आहात, अशा शब्दात संजय राऊत यांनी जाहीर सभेतून गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांनी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीची पहिली सभा अकोले तालुक्यात पार पडली. यावेळी, संजय राऊत यांनी मोदी-शाहांवर हल्लाबोल केला. या सभेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख हेही उपस्थित होते. ''देश उभा करण्यात मोदी आणि शहाचे योगदान काय?. शेतकऱ्यांना पैसे मिळायला लागले की निर्यातबंदी करतात. आता गुजरातच्या पांढऱ्या कांद्यावरील बंदी उठवली. गुजरातची मत पाहिजे आहेत, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं दुःख मोदी शाहाला कळणार नाही.मोदींना वाटतं गुजरात म्हणजेच देश आहे आणि आपण भारताचे नाही तर गुजरातचे प्रधानमंत्री आहोत,'' असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखली.
महाराष्ट्र लुटून सर्वकाही गुजरातला चाललंय. महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम सुरू असून मोदी आणि शहा महाराष्ट्राबद्दल सुडाचे राजकारण करत आहेत. मोदी शहांना महाराष्ट्राचा राग आहे, औरंगजेब, अफजल खान यांना झोपवणारा महाराष्ट्र आहे. मोदी शहा असं का करताय याचा अभ्यास करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथे झाला. आपल्याला जो इतिहास आहे तो मोदींच्या गुजरातला नाही. शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात तर अफजल खानाचा जन्म गुजरातमध्ये झाला. म्हणून गुजरात सातत्याने महाराष्ट्रावर चाल करून येतोय. मात्र, औरंगजेबाचं थडगं याच महाराष्ट्रात बांधण्यात आलय. या निवडणुकीत महाराष्ट्र मोदी शाहांना त्यांची जागा दाखवून देणार. ही निवडणूक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असून आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचंय, आपलं भविष्य मोदी घडवू शकत नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत भाजपा नेत्यांवर हल्लाबोल केला.
कारस्थान करणारे अमित शाह गृहमंत्री
औरंगजेबाच थडगं याच महाराष्ट्रात बांधण्यात आलय. या निवडणुकीत महाराष्ट्र मोदी शहांना जागा दाखवून देणार आहोत. ही निवडणूक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचंय, मोदी नाही घडवू शकत. मोदी गेल्या दहा वर्षात रोज खोटं बोलत आहेत. नेहरू, शास्त्री, वाजपेयी अशा महान प्रधानमंत्र्यांची परंपरा देशाला लाभलीय. मात्र आता तुळशीत भांगेचं रोपट निर्माण झालंय. रोज खोटं बोलणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभला. रोज कारस्थानं करणारे अमित शहा गृहमंत्री झालेत, त्यांना उखडून फेकल्याशिवाय देश सचोटीच्या मार्गावर जाणार नाही. पहिल्या टप्प्यातील बहुतांश जागेवर भाजपचा पराभव होणार आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)