Rashmi Barve : काँग्रेसच्या रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्दच, जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती
Ramtek Loksabha Election 2024 : उमेदवारी अर्ज बाद ठरवल्याप्रकरणी काँग्रेसच्या रश्मी बर्वेंना दिलासा नाहीच, रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्दच ठेवण्यात आली आहे.
Ramtek Lok Sabha Election 2024 : जात पडताळणीत प्रकरणी अपात्र ठरलेल्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांची उमेदवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्दच ठेवण्यात आली आहे. रश्मी बर्वेंच्या जात पडताळणीत प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे, मात्र उमेदवारी अर्ज रद्दच ठेवण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने निकालाला स्थगिती दिली आहे.
काँग्रेसच्या रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्दच
काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणीला पार पडली. खोटे कागदपत्र लावल्यामुळे काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरविले होते. जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र रद्द झाल्याने रश्मी बर्वे यांचा लोकसभा निवडणूकीची उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता.
जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती
लोकसभा निवडणूकीची उमेदवारी अर्ज रद्द ठरवण्यात आल्यानंतर याविरोधात बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज यावर निकाल अपेक्षित होता मात्र, जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बुधवारी न्यायालयाने सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकला होता, त्यानंतर गुरुवारी हायकोर्टाने निर्णयाला स्थगिती दिली आहे.
उमेदवारी अर्जाबाबत दिलासा नाहीच
रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने अंतरिम (intrim) स्थगिती आहे. मात्र, रश्मी बर्वे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून दाखल केलेला अर्ज बाद केल्याप्रकरणी न्यायालयाने कुठल्याही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
पुढील सुनावणी 22 एप्रिलला
याप्रकरणी नागपूर खंडपीठात पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होईल विशेष म्हणजे तोवर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीचे मतदान पार पडलेली असेल. त्यामुळे रश्मी बर्वे यांना जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी दिलासा मिळाला असला, तरी त्यांची उमेदवारी खारीज केल्याप्रकरणी दिलासा मिळालेला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :