एक्स्प्लोर

Rajya Sabha Nomination: निकम, मास्टर, श्रृंगला अन् जैन; राष्ट्रपती कोट्यातून 4 जणांची राज्यसभेवर निवड, पाहा चारही जणांची A टू Z माहिती

The President of India Rajya Sabha Nomination: उज्ज्वल निकम यांच्यासोबतच सी. सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर संधी मिळाली आहे.

The President of India Rajya Sabha Nomination: ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. उज्ज्वल निकम यांच्यासोबतच सी. सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर संधी मिळाली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे नामांकित सदस्य म्हणून चार प्रतिष्ठित (The President of India Rajya Sabha Nomination) व्यक्तींची नियुक्ती केली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 80(1)(a) अंतर्गत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे देशाच्या कायदेमंडळात विविध क्षेत्रातील तज्ज्ञता आणण्याची संधी मिळते. या चार नावांमध्ये कायदा, परराष्ट्र धोरण, शिक्षण आणि इतिहास अशा विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

1. कसाबचा खटला लढवणारे उज्ज्वल निकम- (Who is Ujjwal Nikam)

उज्ज्वल निकम देशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित सरकारी वकिलांमध्ये गणले जातात. उज्ज्वल निकम यांनी 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून खटला, प्रमोद महाजन खून, 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील अजमल कसाबचा खटला आणि 2016 च्या कोपर्डी बलात्कार खटल्यासारख्या अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये खटल्याचे नेतृत्व केले आहे. उज्ज्वल निकम यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उज्जवल निकम यांना भारतातील न्यायव्यवस्थेच्या ताकदीचे प्रतीक मानले जाते.

2. सी. सदानंदन मास्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ (Who Is C. Sadanandan Master)

सी. सदानंदन मास्टर केरळमधील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. ते राष्ट्रीय शिक्षक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि 'नॅशनल टीचर्स न्यूज'चे संपादक देखील आहेत. 1994 मध्ये राजकीय हल्ल्यात दोन्ही पाय गमावले असले तरी, सी. सदानंदन मास्टर यांनी समाजसेवा आणि शिक्षणाला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. त्यांच्या नियुक्तीकडे सामाजिक सेवेतील योगदानाचे कौतुक म्हणून पाहिले जात आहे.

3. कोण आहेत हर्षवर्धन श्रृंगला? (Who Is Harsh Vardhan Shringla)

हर्षवर्धन श्रृंगला माजी परराष्ट्र सचिव आहेत.  हर्षवर्धन श्रृंगला 1984 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत. हर्षवर्धन श्रृंगला यांनी अमेरिका, बांगलादेश आणि थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. ते २०२० ते २०२२ पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव होते आणि भारताच्या धोरणात्मक परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे. अलिकडेच, हर्षवर्धन श्रृंगला भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात मुख्य समन्वयक म्हणून भूमिका बजावली.

4. इतिहासकार आणि शिक्षिका डॉ. मीनाक्षी जैन (Who Is Meenakshi Jain)

डॉ. मीनाक्षी जैन प्रसिद्ध इतिहासकार आणि शिक्षिका आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये इतिहास शिकवला आहे आणि भारतीय सांस्कृतिक वारशावरील त्यांच्या संशोधन कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. मीनाक्षी जैन 'सती', 'राम आणि अयोध्या' आणि 'देवतांची उड्डाण' यासारख्या प्रसिद्ध पुस्तकांच्या लेखिका आहेत. 2020 मध्ये मीनाक्षी जैन यांना पद्मश्रीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मीनाक्षी जैन भारतीय इतिहास आणि परंपरांवरील संशोधनासाठी ओळखल्या जातात.

उज्ज्वल निकम यांना खासदारकी, VIDEO:

संबंधित बातमी:

Ujjwal Nikam: नरेंद्र मोदींचा फोन आला अन् विचारलं मी हिंदीत बोलू की मराठीत...; उज्ज्वल निकम यांनी राज्यसभेवरील निवडीनंतर सांगितला कालचा किस्सा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार
Buldhana Bus Driver Drunk : मद्यधुंद बस चालकांचा खामगाव बसस्थानकात धिंगाणा!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
Sanjay Raut: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शाहांच्या हातात, प्रफुल पटेल शाह सांगतात तेच बोलतात, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही: संजय राऊत
प्रफुल पटेल अमित शाहांना हवं तेच बोलतात, राष्ट्रवादी काँग्रेसचा कंट्रोल अमित शाहांकडे: संजय राऊत
Police Recruitment Beed News: बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
Narhari Zirwal: नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण, आदिवासी संमेलनाला गेलेच नाहीत, लाचखोरी प्रकरणामुळे प्रचंड कोंडी
नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण, आदिवासी संमेलनाचे आयोजक वाट पाहत बसले पण....
Embed widget