सुषमा अंधारे हल्लाबोल करतात, ते शिंदे गटाच्या जिव्हारी लागतं: अंबादास दानवे
खालच्या स्तरावर राजकारण शिंदे गट करत आहे. दसरा मेळाव्याला पण ठाकरे यांच्या कुटूंबातील व्यक्तींना घेतलं. तसेच आज सुषमा अंधारे या हल्लाबोल करत आहे. ते शिंदे गटाच्या जिव्हारी लागत आहे, असं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.
Ambadas Danve On Shinde Group: ''खालच्या स्तरावर राजकारण शिंदे गट करत आहे. दसरा मेळाव्याला पण ठाकरे यांच्या कुटूंबातील व्यक्तींना घेतलं. तसेच आज सुषमा अंधारे या हल्लाबोल करत आहे. ते शिंदे गटाच्या जिव्हारी लागत आहे. त्यामुळं आज त्याच्या पतींना प्रवेश दिलाय'', असं ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत. पुण्यात पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत. ते आज आणि उद्या कार्यक्रमाला पुण्यात असणार आहेत.
यावेळी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर बोलताना ते म्हणाले आहेत की, कीर्तिकर अचानक निर्णय घेतला. जेष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर टीका नाही, पण पक्षांनी त्यांना सर्व दिलं. शिंदे तरी कोण आहेत. गजानन कीर्तिकर समोर, सन्मान दिला जात नाही, हा आरोप खोटा आहे. पक्षाने सर्व काही दिलंय त्यांना. ते म्हणाले मनात विष पेरलेले आहेत त्या लोकांनी जावं असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दानवे म्हणाले, आदित्य ठाकरे राहुल गांधी एकत्र आले हे जिव्हारी लागलं. त्यामुळे ट्रोल होत आहेत. भारताला जोडण्यासाठी राहुल गांधी यात्रा करत असतील तर ते चांगलं आहे. युवा शक्ती एकत्र आली तर येणाऱ्या काळात त्याचे परिणाम दिसतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या वक्तव्यावर ते म्हणाले, उद्धव ठाकरे प्रबोधनकारचे नातू आहे. अंधश्रद्धा पाळत नाहीत. त्यामुळे असं बोलणं चुकीच आहे. मध्यावधी निवडणुकीवर राज्यभर सुरु असलेल्या चर्चेवर ते म्हणाले, असविधांनात्मक पद्धतीने सरकार आलं. आमदार बद्दल याचिका कोर्टात आहे. असं असल्याने सरकार कसं चालेल. त्यामुळे मध्यावधी निवडणूक चर्चा सुरू आहेत. आमदार अतुल भातखळकर यांच्यावर टीका करताना दानवे म्हणाले, मला वाटत भातखळकर 25 वर्ष उद्धव ठाकरे युतीत चालले. आता भातखळकर ढोंगीपणा करत आहेत असं काहीही बोलत आहेत.
संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की, एखाद्या माणसाचं कौतुक करणं म्हणजे असं नाही की ते नरमले आहेत. आजचा सामना वाचा भाजप आणि केंद्र यांच्याबद्दल काय मांडले येणाऱ्या काळात कळेल. चांगल्या ला चांगलं म्हटलं पाहिजे वाईट ला वाईट म्हटलं पाहिजे, फडणवीस यांचे काही राऊत यांना काही चांगले वाटलं असेल त्यामुळे त्यांनी कौतुक केलं असेल.