Priyanka Gandhi : प्रियंका गांधी पहिल्यांदा निवडणूक लढवणार, राहुल गांधीच्या राजीनाम्यानंतर वायनाडमधून पोटनिवडणुकीच्या रिंगणात
Rahul Gandhi to resign from Wayanad : काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचा राजीनामा देणार असून रायबरेलीचे खासदार म्हणून कायम राहणार आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) वायनाडमधील (Wayanad) जागा प्रियंका गांधी यांच्यासाठी सोडणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडच्या जनतेचे आभार मानले. वायनाड पोटनिवडणुकीत राहुल गांधी यांच्याऐवजी प्रियंकां गांधी पोटनिवडणूक लढवणार आहेत.
प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, राहुल गांधी रायबरेलीचे खासदार राहतील. त्यांनी वायनाडची जागा सोडण्याची घोषणा केली आणि प्रियांका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार असल्याचंही सांगितलं. काँग्रेसने एकाच दिवसात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. एक म्हणजे रायबरेलीतून खासदार राहण्याचा राहुल गांधींचा निर्णय आणि दुसरे म्हणजे वायनाड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनेही आपला उमेदवार उभा केला आहे.
राहुल गांधी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देणार
काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचा राजीनामा देणार असून रायबरेलीचे खासदार म्हणून कायम राहणार आहेत. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या जागांवर विजय मिळवला. आता ते रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार आहेत.
रायबेरली आणि वायनाडमध्ये राहुल गांधींचा विजय
राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये भाजपचे दिनेश प्रताप सिंह (Dinesh Pratap Singh) यांचा दारुण पराभव केला होता. तर वायनाडमध्ये माकपाचे एनी राजा यांच्याविरोधात तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवलाय होता.
रायबरेली मतदारसंघ गांधी कुटुंबांचा गड
उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघ गांधी कुटुंबांचा गड मानला ताजो. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्या मैदानात उतरल्या नाहीत. त्या राज्यसभा सदस्य आहेत.