Nitn Gadkari : 'बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात', नितीन गडकरींची तुफान बॅटिंग
पक्षासाठी झटणाऱ्या प्रत्येकाकडे पक्षश्रेष्ठींचं लक्ष असते. त्यामुळे पुढे पुढे करणारे नेत्यांची दिशाभूल करु शकत नाही याची नोंद प्रामाणिक कार्यकर्त्याने घ्यावी, असेही गडकरी म्हणाले.

नागपूरः एखाद्याकडून आपला काम कसा करवून घ्यायचा यामध्ये आमदार चंद्रशेखर बावनकुळे एक्स्पर्ट आहेत. कोणाचं पत्र, कोणाची फाईल आणि निधी कोणत्या गावात गेला हे फक्त त्यांनाच कळते. मात्र त्यांचा काम तोपर्यंत निघून जाते. बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कौशल्याची स्तुती केली. एखाचे काम करायचे असल्यास ते कशाप्रकारे पूर्णत्वास आणायचे याचे कौशल्य बावनकुळेंमध्ये असल्याचेही यावेळी गडकरी यांनी सांगितले.
पुढे गडकरी म्हणाले, 'नागपूर जिल्ह्यात पक्षाला भक्कम करण्यात बावनकुळेंचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची आणि कुटुंबाची चिंता सोडून स्वतःला पक्षासाठी झोकून दिले. त्यांनी उर्जा विभागाचे मंत्री असताना राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यासोबतच त्यांनी सर्व अडचणी सोडविल्या.'
सत्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, भाजपचे ज्येष्ठ नेते अजय संचेती यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सत्कार सोहळ्यात उपस्थित नेत्यांनी बावनकुळे यांना शुभेच्छा देत त्यांच्यातील कौशल्याची स्तुती केली.
चमकोगिरी करणाऱ्यांमुळे विचलित होऊ नका, कार्यकर्त्यांना गडकरींचा सल्ला
ऑटो चालणारा एक सामान्य भाजप कार्यकर्ता आपल्या कर्तुत्वामुळे पक्षाचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे. ही प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देणारी बाबा आहे. आपल्या पक्षात परिवार वाद आणि लॉबिंग चालत नाही याचा संदेश याद्वारे सर्वांना मिळाला आहे. पक्षासाठी झटणाऱ्या प्रत्येकाकडे पक्षश्रेष्ठींचं लक्ष असते. त्यामुळे पुढे पुढे करणारे नेत्यांची दिशाभूल करु शकत नाही याची नोंद प्रामाणिक कार्यकर्त्याने घ्यावी. हार घेऊन येणारे आणि बॅनर लावणाऱ्यांना बघून तुम्ही विचलीत होऊ नका असा सल्लाही यावेळी गडकरींनी दिला.
सत्कार सहोळ्यापूर्वी तिरंगा रॅली
सत्कार सोहळ्यापूर्वी नागपुरातील त्रिशरण चौक ते शताब्दी चौकापर्यंत आज काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला. यामध्ये केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नागपूर शहर भाजपाध्यक्ष आमदार प्रविण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार मोहन मते, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार गिरीश व्यास, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर यांच्यासह शहर, जिल्हा भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळेतील हजारो विद्यार्थी उपस्थित होते.
Devendra Fadnavis : विरोधात असतानाही सत्ताधाऱ्यांकडून बावनकुळेंची स्तुती व्हायची, त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती ही विदर्भातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाबः देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
