एक्स्प्लोर

Prakash Shendge: 57 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करा, सगेसोयरेंच्या जीआरला विरोध; ओबीसी नेत्यांच्या बैठकीत विधानसभेच्या 288 जागा लढवण्याचा ठराव

Maharashtra Politics: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाप्रमाणे आम्हीही 288 जागांवर उमेदवार उभे करु, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला. ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून 288 जागांवर उमेदवारी देण्याची योजना

नागपूर: राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर लढण्याची तयारी ओबीसी समाजाकडून (OBC Reservation) करण्यात आल्याचे वक्तव्य प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी केले. नागपूरमध्ये  रविवारी ओबीसी संघटनांची विदर्भस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याप्रमाणेच 288 जागांवर ओबीसी उमेदवार उभे करण्याचा इशारा या बैठकीतून सरकारला देण्यात आला. त्यामुळे आता राज्य सरकार ओबीसी नेत्यांची समजूत घालण्याच्यादृष्टीने कोणती पावले उचलणार, हे पाहावे लागेल. 

नागपूरमधील ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवण्याचा ठराव मंजूर झाला. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगेसोयरेंचा शासन आदेश GR काढल्यास राज्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला. 

याशिवाय, बैठकीत ओबीसी समाजाच्या भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा झाली. ओबीसी आरक्षणाचे  रक्षण करण्याच्यादृष्टीने या बैठकीत काही ठराव मंजूर झाले. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये ओबीसी उमेदवार उभे करण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. ओबीसी बहुजन पार्टी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवेल, यावरही एकमत झाले. याशिवाय, राज्य सरकारने अलीकडच्या काळात केलेल्या 57 लाख कुणबी नोंदी या बोगस आहेत, त्या तातडीने रद्द कराव्यात, अशी ओबीसी समाजाची मागणी असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. 

राज्य सरकारचे शिष्टमंडळ ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची भेट घेणार

ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडगोद्री येथे प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. गेल्या चार दिवसांमध्ये रक्तदाब कमी झाल्याने लक्ष्मण हाके यांची प्रकृती काहीशी खालावली आहे.  या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात संदीपान भुमरे, अतुल सावे, भागवत कराड यांचा समावेश आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, हे लिहून द्या, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली होती. ही मागणी राज्य सरकार मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल. 

आणखी वाचा

प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 11 November 2024Kishori Pednekar on Amit Thackeray | अमित ठाकरे हे आक्रमक नाही तर उद्धट, पेडणेकरांची टीकाZeeshan Siddique Mumbai : रेकॉर्ड ब्रेक मतांनी यावर्षी मी निवडून येणार आहेKalidas Kolambkar vs Shraddha Jadhav:श्रद्धा जाधव की कालिदास कोळंबकर वडाळ्यात विधानसभेत कोण जिंकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
VIDEO : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
Embed widget