(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिंदे गटाच्या आमदारांच्या मनोज जरांगेंशी गाठी भेटी वाढल्या, उदय सामंतानंतर संजय शिरसाट भेटीला
आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट मनोज जरांगे यांची जालन्यातील अंतरवाली सराटीत भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास झालं चर्चा सुरु आहे.
Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहे. राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना देखील अनेकजण भेटायला येत आहेत. आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मनोज जरांगे यांची जालन्यातील अंतरवाली सराटीत भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास झालं चर्चा सुरु आहे. शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे उमेदवार आहेत.
दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी यांनी देखील कालच मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली होती. त्यानंतर लगेच आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील आज अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसापासून शिंदे गटाच्या आमदारांच्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी गाठी भेटी वाढल्या आहेत. त्यामुळं विविध चर्चांना उधाण आलं आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. गाठीभेटी पक्षांतर, उमेदवार याद्या, उमेदवारी अर्ज भरण्यात येत असून राजकीय क्षेत्रात हालचाली वाढल्या आहेत. अशातच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची काल अंतरवाली सराटीत भेट घेतली होती. दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते. अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घरी ही भेट झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. सर्व पक्षांच्या याद्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आपले निर्णय, उमेदवार जाहीर करू असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर त्यांनी उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली आहे. या दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दोघांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता आहे. मनोज जरांगे पाटील आणि मंत्री उदय सांमत यांच्यात मैत्रीपुर्ण, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange: विधानसभेच्या तोंडावर घडामोडींना वेग! अंतरवालीत मनोज जरांगे-उदय सामंतांची भेट, चिवटेही उपस्थित, भेटीवर सामंत म्हणाले, 'राजकीय चर्चा...'