Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Budget 2023 : या अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरता अर्थसंकल्प (Budget) सभागृहात सादर करण्यात आला आहे. दरम्यान यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असून, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. तर या अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
अर्थसंकल्पाबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, महाविकास आघाडीची जी काही पंचसूत्री होती त्याचंच नाव बदलून, पंचामृत करण्यात आला आहे. कुठेही शेतकऱ्यांना यात दिलासा मिळाला नाही. ज्या योजना अजित पवार मुख्यमंत्री असताना जाहीर करण्यात आल्या होत्या, त्याच घोषणा पुन्हा करण्यात आल्या आहे. तर या अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला असल्याचं दानवे म्हणाले आहे.
महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
या अर्थसंकल्पाला जुमलेबाजी म्हणता येईल. महिलांना न्याय मिळाला नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आणि बेरोजगारांना देखील न्याय मिळाला नसल्याचं अंबादास दानवे म्हणाले. त्यामुळे आताच्या सरकाराने बेरंग असा अर्थसंकल्प मांडला आहे. जनतेशी या सरकारला कोणतेही देणघेणं नाही. पैसे उत्पनाचा स्त्रोतच नाही तर या घोषणा कशाप्रकारे केलेल्या आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं दानवे म्हणाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
शिंदे-फडणवीस सरकारची बजेट एक्स्प्रेस सुस्साट; वाचा राज्य अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी एका क्लिकवर