Aurangabad News: "सरकारमध्ये असलो म्हणून बांगड्या घातल्या नाही"; मारहाणीच्या व्हिडीओवर आमदार बांगरांचे उत्तर
Santosh Bangar: शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य (Principal) अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Santosh Bangar: नेहमी कोणत्या-कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) पुन्हा एका नवीन वादात सापडले आहे. हिंगोली (Hingoli) शहरालगत असल्यास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य (Principal) अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर खुद्द आमदार बांगर यांनी खुलासा केला आहे. मारहाण करण्यात आलेल्या प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळे माहिलेवर अत्याच्यार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी त्याची पर्वा नसल्याचं बांगर यांनी म्हंटले आहे.
औरंगाबादच्या (Aurangabad) विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 2023-24 च्या आराखड्याची बैठकीसाठी आलेल्या बांगर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, सरकार आमचंच आहे, मात्र सरकारमध्ये राहून आवाज उठवावा लागतो. आम्ही काय हातात बांगडया घातल्यात का? अन्यायाविरोधात लढा देणे शिवसैनिकाच कर्तव्य आहे. त्या प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळे माहिलेवर अत्याचार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरीही चालेल. तसेच संबंधित महिलेची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून आम्ही गप्प बसलो आहे. अन्यथा प्राचार्यावरती गुन्हा दाखल झाला असता, असेही बांगर म्हणाले. तर घटना होऊन आठ दिवस झाले असताना त्या प्राचार्यांने माझ्यावर गुन्हा का दाखल केला नाही, असाही प्रश्न बांगर यांनी उपस्थित केला.
काय आहे प्रकरण?
आमदार संतोष बांगर यांच्याकडून एका व्यक्तीला मारहाण होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. तर हिंगोली (Hingoli) शहरालगत असल्यास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य (Principal) अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे फक्त आमदार बांगरच नाही तर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान याबाबत पोलिसातअजूनही कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच मारहाण बाबत संबधित प्राचार्यांची देखील कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र महिलेची छेड केल्याने मारहाण केल्याचं दावा आमदार बांगर यांनी केला आहे.
आमदार बांगर आणि वाद...
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि वाद हे आता एक समीकरण बनले आहे. कारण बांगर यांच्या कारनाम्याचे अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. 26 जून 2022 शिवसेनेतील बंडांनंतर बांगर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांची मुलं अविवाहित मरतील असं वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर 17 जुलै 2022 रोजी गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा, असं वक्तव्य केले. पुढे 15 ऑगस्ट 2022 रोजी माध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या गोडाऊन व्यवस्थापकाला मारहाण केली. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2022 रोजी विमान कंपनी कार्यालयात तोडफोड आणि कृषी अधिकाऱ्याला धमकावल्याचा प्रकार समोर आला होता. तर 27 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यातच आता एका प्राचार्याला कार्यकर्त्यांसह मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
संबंधित बातमी:
Santosh Bangar News : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा प्राचार्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल