Kirit Somaiya: 'नॉट रिचेबल किरीट सोमय्या' मुंबईत दाखल, 'होमवर्क करण्यासाठी झालो भूमिगत'
Mumbai: आयएनएस विक्रांत प्रकरणी अटकेच्या भीतीने गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले भाजप नेते किरीट सोमय्या अखेर मुंबईत दाखल झाले आहेत.
Ins Vikrant Case: आयएनएस विक्रांत प्रकरणी अटकेच्या भीतीने गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले भाजप नेते किरीट सोमय्या अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. 8 एप्रिलनंतर सोमय्या हे सर्वांसमोर आले आहेत. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ''मी होमवर्क करण्यासाठी म्हणून भूमिगत झालो होतो.''
मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते मुंबईत परतले आहेत. त्यांनी अटकेपासून संरक्षण दिल्याबद्दल न्यायालयाचे आभार मानले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, न्यायालयाने आज जे प्रश्न उपस्थित केले, तेच प्रश्न मी गेले आठ दिवस उद्धव ठाकरे यांना विचारत आहे. सीएमओचं काम फक्त पोलिसांना माफियागिरी करायला लावायची. खोट्या एफआयआर फाईल करायच्या. अटक करून तुरुंगात टाकायचं, हे महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवत आहे, असं ते म्हणाले आहेत.
आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही: सोमय्या
कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्या प्रकरणी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''आम्ही दमडीचाही घोटाळा केलेला नाही. 58 कोटींची भाषा संजय राऊत यांनी वापरली होती. हा आठवा आरोप होता आणि आठी आरोपांमध्ये एकही कागदी पुरावा नाही. फक्त स्टंटबाजी करत दोन-पाच दिवस मीडियाचं अटेंशन मिळवायचं. न्यायालयावर मला विश्वास आहे. न्याय मिळायची सुरुवात झाली आहे.''
'भाग सोमय्या भाग'वर काय म्हणाले
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना 'भाग सोमय्या भाग' असा चित्रपट काढायला हवा, असं म्हणाले होते. यावर उत्तर देताना ते म्हणाले आहेत की, हे जे नाटक सुरु होत केले चार-पाच दिवस ते उद्धव ठाकरे यांनीच ठरवलं होत. संजय राऊत प्रवक्ता आहेत. मास्टरमाइंड उद्धव ठाकरे आहेत. कारण त्यांच्या मुलांचे-पत्नीचे घोटाळे बाहेर यायला लागले, म्हणून कसं ही करून सोमय्याला जेलमध्ये टाका. यासाठी हे सर्व करण्यात आल्याचं ते म्हणाल आहेत. असं असलं तरी ठाकरे सरकारमधील डर्टी डझन नेत्यांना तरुंगात पाठवणार, असं पुन्हा एकदा सोमय्या म्हणाले आहेत.
दरम्यन, कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांना दिला देत अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय न्यायालयाने त्यांना सोमवार 18 एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत.
संबंधित बातमी:
किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर, तर चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha