आधी उमेदवार बदलण्याची वेळ, आता बालेकिल्ल्यातही जागा राखताना दमछाक, एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?
Eknath Shinde's Shivsena and BJP : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपकडून दबावतंत्राचा वापर सुरुच आहे. हिंगोली लोकसभा (Hingoli Loksabha) मतदारसंघातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी देण्यात आली होती.
Eknath Shinde's Shivsena and BJP : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपकडून दबावतंत्राचा वापर सुरुच आहे. हिंगोली लोकसभा (Hingoli Loksabha) मतदारसंघातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीबाबत भारतीय जनता पक्ष नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शिंदे यांनी उमेदवारी बदलत बाबूराव कदम (Baburao Kadam) यांना उमेदवारी घोषित केली आहे. दरम्यान, उमेदवार बदलल्यानंतर आता नाशिक, ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघ राखण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची दमछाक होताना दिसत आहे. त्यामुळे भाजप चहुबाजूंनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची कोंडी करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
नाशिक, ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचा मतदारसंघ कोणाला मिळणार?
हिंगोलीचा उमेदवार बदलल्यानंतर भाजपकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि ठाण्याच्या जागेवर दावा करण्यात येतोय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नाशिकच्या जागेवर निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. मंत्री छगन भुजबळ स्वत: नाशिकच्या जागेवरुन निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. शिवाय, एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाण्याचा मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत विद्यमान खासदार आहेत, त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देणे देखील कठीण झाले आहे.
नारायण राणे, छगन भुजबळांची जोरदार तयारी
नाशिकच्या जागेमुळे सातारा लोकसभा अडकली आहे. नाशिक राष्ट्रवादीला गेली तर सातारा भाजपला सुटेल. उदयनराजे भोसले भाजपच्या तिकीटावर लढण्यासाठी ठाम आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होत नाहीये, पण प्रचार सुरू करण्यात आला आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी देखील प्रचाराची तयारी पूर्ण केली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येही नारायण राणे पुर्ण ताकदीने कामाला लागेलत, त्यामुळे ही जागा भाजपला सुटल्यात जमा आहे असं दिसतंय. तर ठाणे लोकसभेचा आपला आग्रह भाजपने अजूनही सोडलेला नाही त्यामुळे ठाण्याचा तिढा कायम आहे. त्यामुळे 3 ठिकाणच्या उमेदवार बदलानंतर सेनेच्या या 3 जागा स्वतःकडे ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंचा कस लागणार असण्याची शक्यता आहे.
भावना गवळी हेमंत गोडसेंची नाराजी कायम
नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार नसल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे भावना गवळी नाराज आहेत. भावना गवळी यांना उमेदवारी दिल्यास यवतमाळमध्ये मोठा फटका बसू शकतो, असं भाजपला सर्वेक्षणातून जाणवलंय. त्यामुळे भावना गवळी यांच्या उमेदवारी मिळू नये, याबाबत भारतीय जनता पक्ष ठाम आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
शिंदेंच्या शिवसेनेतील अनेकांचे परतीसाठी फोन, संजय राऊतांचा 'तोंडी परीक्षेत' मोठा दावा