एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी नाना पटोलेंचा निवडणूक प्रमुख हायकोर्टात, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

CM Ladki Bahin Yojana: आम्हाला तुमचा आशीर्वाद असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरु राहील; देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेतंर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

लातूर: राज्यातील महायुती सरकार महिलांना मजबूत आणि सक्षम करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. मात्र, काही लोक लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयात जाणारी ही व्यक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची निवडणूक प्रमुख म्हणून काम करते, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते बुधवारी उद्गीर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर जोरदार आगपाखड केली. माझी विरोधकांना विनंती आहे की, त्यांनी लाडकी बहीण योजनेकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये. या योजनेला विरोध करुन का. ही योजना आपल्या बहि‍णींसाठी आहे. दिवसभर राबणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होतात तेव्हा त्यांना त्याचं मोल कळतं. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना या 1500 रुपयांचे मोल कळणार नाही. पण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली काहीही झालं तरी ही योजना सुरु ठेवू. तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करु शकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आम्ही शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफ केले आहे. तसेच तरुणांसाठी कार्य प्रशिक्षण योजना सुरु करून लाडक्या भावांनाही मदत केली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

उद्गीरध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते भव्य बुद्धविहाराचे लोकार्पण

बुध्दाची मूर्ती ही अतिशय सुबक असून ही थायलंडवरून मागवण्यात आली आहे. बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचा धम्म सर्वसामान्य लोकांमध्ये पोहोचवला. आज जगातील प्रगत राष्ट्रामध्ये सर्वाधिक बौद्ध धम्म मानणारे लोकं आहेत. जगातील सर्वात उत्तम संविधान त्यांनी लिहिले. जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही. लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लीलावात निघालेले घर आम्ही विकत घेतलं, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

मोदींच्या नेतृत्वात हा देश प्रगती करत आहे. मोदींनी सांगितलं की, महिलांना केंद्र बिंदू मानून योजना आणल्या तरच 2047 साली विकसित होईल. त्यामुळे लखपती दीदी सारख्या योजना मोदींनी सुरु केल्या. तसेच मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात 'लेक लाडकी', 'लाडकी बहीण', 'महिला सशक्तीकरण', एसटी मध्ये 50% टक्के सूट अशा योजना सुरु केल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News LIVE Updates: अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका
Maharashtra News LIVE Updates: अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका
Dhananjay Munde meet Devendra Fadnavis: परळीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, धनंजय मुंडेंनी स्वत: भेट घेऊन आभार मानले
परळीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, धनंजय मुंडेंनी स्वत: भेट घेऊन आभार मानले
Nagpur : बेपत्ता मुलीच्या शोधासाठी कुटुंबाच्या विनवण्या, पोलीसांचा गजब तर्क, म्हणाले 'गाडीत डिझेल नाही', नागपुरातील 'त्या' अधिकाऱ्यावर कारवाई होणार, पालकमंत्र्यांचे आदेश
बेपत्ता मुलीच्या शोधासाठी कुटुंबाच्या विनवण्या, पोलीसांचा गजब तर्क, म्हणाले 'गाडीत डिझेल नाही', नागपुरातील 'त्या' अधिकाऱ्यावर कारवाई होणार, पालकमंत्र्यांचे आदेश
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात; वरिष्ठ नेते फडणवीसांना भेटत असल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा
सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात; वरिष्ठ नेते फडणवीसांना भेटत असल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
Petrol Diesel price Hike: पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Sunetra Pawar EV Car: पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी ईव्ही कार पाहिलीत का?
पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवार ईव्ही कार वापरणार, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी कार पाहिलीत का?
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईतील शेवटच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
Heat Wave: विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
Embed widget