Devendra Fadnavis on Uddhav Thackeray...तर तुमच्यावर चार-पाच ग्लास कोमट पाणी प्यायची वेळ येईल, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (दि.12) पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (दि.12) पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा मी अडीच वर्षात काय केलं ते सांगतो, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आज मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे भाषण मोबाईलवर ऐकले. त्यात ते म्हणाले अडीच वर्षात आम्ही काय काम केलं, ते ऐकायचे असेल तर एका मंचावर या. अरे उद्धवजी अडीच वर्ष तुम्ही नुसतं फेसबुक लाईव्ह करत होते आणि कोमट पाणी प्या असे म्हणत होते. उपराजधानी नागपूरला सुद्धा तुम्ही आले नाहीत.
टोमणे मारल्यामुळे तुम्हाला मत तर मिळणार नाहीत
तुम्ही आमच्याशी विकासावर चर्चा करू नका. जर आम्ही नुसतं गडकरींनी केलेल्या विकास कामांची यादी सांगितली, तर तुम्हाला चार-पाच पेले कोमट पाणी प्यायची वेळ येईल. त्यामुळे तुम्ही नुसते टोमणे मारत बसा. टोमणे मारल्यामुळे तुम्हाला मत तर मिळणार नाहीत. मात्र तुमच्या मनाचा समाधान नक्कीच होईल, असंह देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
उद्धव ठाकरेंची पीएम मोदींवर सडकून टीका
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथे प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी ठाकरेंचा सेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा केला. यावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पालघरच्या सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. नकली शिवसेना असायला ती काय तुमची डिग्री आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय. शिवाय ठाकरेंनी अमित शाहांचा चागंलाच समाचार घेतला. अमित शाहांच्या गाडीत अस्सल भाजपवाले किती? तुमच्या स्टेपण्या किती आत आहेत ते बघा, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या