By-Elections: 3 लोकसभा आणि 7 विधानसभेच्या जागांसाठी 23 जून रोजी पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाने जाहीर केली माहिती
Assembly By-Elections: निवडणूक आयोगाने तीन लोकसभा आणि सात विधानसभेच्या पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 23 जून रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
Assembly By-Elections: निवडणूक आयोगाने तीन लोकसभा आणि सात विधानसभेच्या पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 23 जून रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. 26 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने पंजाबमधील संगरूर, उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आझमगड लोकसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. भगवंत मान मुख्यमंत्री झाल्यानंतर संगरूरची जागा रिक्त झाली होती.
तसेच आझम खान यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रामपूरची जागा रिक्त झाली होती. अखिलेश यादव आझमगडमधून खासदार म्हणून निवडून आले. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
Bye-elections for Parliamentary and Assembly constituencies in Punjab, Uttar Pradesh, Tripura, Andhra Pradesh, NCT of Delhi, & Jharkhand, will be held on 23rd June 2022. pic.twitter.com/96HjraCubh
— ANI (@ANI) May 25, 2022
दुसरीकडे त्रिपुरातील आगरतळा, टाउन बोर्डोवाली, सूरमा आणि जुबराजनगर विधानसभा जागांवर 23 जून रोजी मतदान होणार आहे. याशिवाय दिल्लीच्या राजेंद्र नगर, झारखंडच्या मंडारी आणि आंध्र प्रदेशच्या आत्मकूर विधानसभेसाठीही मतदान होणार आहे. राघव चढ्ढा यांच्या राजीनाम्यामुळे राजेंद्र नगरची जागा रिक्त झाली होती. राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चढ्ढा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, मतमोजणी 26 जून रोजी होणार असून पोटनिवडणुकीची अधिसूचना 30 मे रोजी जारी केली जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या:
Indian Army: देशातील पहिल्या महिला लढाऊ विमानचालक ठरल्या कॅप्टन अभिलाषा बराक; सेनाने केलं सन्मानित
Yasin Malik Convicted : फुटीरतावादी यासिन मलिकला अखेर जन्मठेप; NIA कोर्टाने सुनावली शिक्षा
Monsoon Update : श्रीलंकेच्या वेशीवर खोळंबलेला मान्सून पुढे सरकला; कोकण, विदर्भासह गोव्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज