Leopard attack Government job: बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Leopard attack Government job: वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यास शासनाकडून जबाबदारी म्हणून मदतीचा हात पुढे केला जाणार आहे.

Leopard attack Government job: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या (Leopard Attack) आणि वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण वेगाने वाढत असून अनेक नागरिकांचा जीव या हल्ल्यांत जात आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावलेल्या घरांची अवस्था बिकट होत असल्याने सरकार (Maharashtra Government) आता मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना वन विभागात सरकारी नोकरी देण्याच्या प्रस्तावाचा गंभीरपणे विचार करत आहे. वन विभागातील (Forest Department) वरिष्ठ सूत्रांकडून याबाबत माहिती समोर येत आहे.
Leopard attack Government job: वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
राज्यात मानवी जीवितहानी वाढत असल्याने राज्य शासन एक महत्त्वाच्या प्रस्तावाच्या विचाराधीन आहे. वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास सरकार वन विभागात नोकरी देण्यासंदर्भात हा प्रस्ताव आहे. संबंधित कुटुंबावर आलेला डोंगराएवढा आर्थिक भार लक्षात घेता शासन लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ शकते, अशी माहिती वन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यावर त्यांच्या घराची आर्थिक वाताहत, मुलांचे शिक्षण, घरखर्च, शेती व कर्ज या सर्व जबाबदाऱ्यांची मोठी मशागत उरते. त्यामुळे आर्थिक मदतीबरोबरच नोकरी हा दीर्घकालीन दिलासा म्हणून हा प्रस्ताव पुढे आणण्यात आला मिळत आहे.
Leopard attack Government job: राज्यात बिबट्या, वाघांच्या हल्ल्यांत वाढ
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत बिबट्या आणि वाघांच्या हालचाली वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी जनावरांवर हल्ले, तर काही प्रसंगी मानवांवरही हल्ले होऊन मृत्यू झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय नोकरीसंदर्भातला प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Parbhani Leopard News: परभणीच्या पाथरी तालुक्यात बिबट्याचा वावर
दरम्यान, परभणीच्या पाथरी तालुक्यातील रेनाखळी शिवारामध्ये मागच्या आठवडाभरापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. या ठिकाणी बिबट्याने दोन जनावरांचा जीव घेतला असून रेनाखळी शिवारातील प्रमोद हरकळ, संदीपान श्रावणे यांच्या शेतामध्ये वन विभागाने ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. तीन ट्रॅप कॅमेऱ्यामधील एका कॅमेऱ्यामध्ये बिबट्या आढळून आला असून या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच जनावरे बाहेर बांधण्याऐवजी आत बांधावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे. सध्या या बिबट्यावर वनविभाग लक्ष ठेवून आहे.
Sakri Leopard News: साक्री तालुक्यात बिबट्याचा मुक्तसंचार
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल आणि कोंडायबारी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काल दहिवेल परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने प्रवाशांची आणि स्थानिकांची झोप उडाली आहे. हा बिबट्या महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडीझुडपांमध्ये दबा धरून बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अचानक हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, दहिवेल आणि कोंडायबारी घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना अत्यंत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सायंकाळनंतर आणि रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे टाळावे किंवा अत्यावश्यक असल्यास समूहाने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला थांबणे किंवा निर्जन स्थळी वाहने उभी करणे धोक्याचे ठरू शकते. वनविभागाने या भागात गस्त वाढवली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला किंवा पोलिसांना कळवावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
Ahilyanagar Leopard News: बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको
अहिल्यानगर–कल्याण महामार्गावर किन्ही ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. पारनेर तालुक्यातील किन्ही गावात बिबट्याच्या हल्ल्यात भागूबाई खोदडे यांचा मृत्यू झाला होता. मात्र आठवडा उलटूनही वन विभागाकडून नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्याची कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत रस्ता रोको सुरू केला. पोलिसांनी रस्ता रोको करण्यास विरोध दर्शवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. ग्रामस्थांनी पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलन सुरू ठेवले. परिस्थिती हाताळण्यासाठी अधिक पोलीस फोर्स घटनास्थळी दाखल झाला होता.
आणखी वाचा
























