Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
कबुतरावरुन समाजकारण, धर्मकारण आणि राजकारण एवढं ढवळून निघेल असं कोणी सांगितलं असतं तर त्यावर विश्वास बसला नसता. पण निवडणुकीचा हंगाम असला की अशा सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागतो. आता हेच बघा ना शांतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जैन समाजाचे मुनी पुन्हा सक्रीय झाले आहेत आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांना मनसे तेवढंच तिखट उत्तर देत आहे. फक्त आपापल्या धर्मापुरता विचार करणाऱ्या या लोकांना महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोय का? पाहुयात
((बिल्डींगमध्ये जाऊन प्राणीमात्रांसाठी जनजागृती करणार, आप बटोंगे तो पिटोगें, भाषेवरून मारहाण किती योग्य? आम्ही जैन सनातनी आहोत.... प्रत्येक वॉर्डात कबुतर रक्षक तयार करणार))
जैन मुनी निलेशचंद्र महाराजांची ही वक्तव्य...
हे राजकीय नेते नाहीत तर हे जैन समाजातील साधू आहे...
मात्र आता त्यांच्या तोंडी आंदोलनाची, राजकारणाची भाषा रुळू लागलीय.
((कबुतरखाना आंदोलनाचे शॉट्स, जैन मुनी निलेशचंद्र यांचे आंदोलनाचे शॉट्स))
कबुतरखान्यावरून सुरू झालेला हा वाद आता थेट राजकीय होऊ लागलाय,
मराठी भाषेचा सन्मान, धर्माची निष्ठा अशा गोष्टी आता निलेशचंद्र महाराज बोलू लागले आहेत.
<<WIN TEXT- जैनमुनींच्या तोंडी राजकीय भाषा >>
((बाईट- निलेशचंद्र महाराज, जैनमुनी
R MUM NILESH JAIN MUNI PC LIVE 071225
((तुमच्या वरून जास्त महाराष्ट्राचा सन्मान राजस्थानी जास्त करतो
तुम्हाला मराठी भाषेचा सन्मान आहे तर मग भेंडी बाजारात जा
मी कट्टर सनातनी आहे माझ्या पाटी जैन नका सनातनी जैन लावा))
आता मुंबईतल्या प्रत्येक टॉवरमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचा निर्धार त्यांनी केलाय. कबुतरांमुळे कोणतेही आजार होत नाहीत असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलंय.
<<WIN TEXT- टॉवरमध्ये जाऊन जनजागृती>>
((बाईट- निलेशचंद्र महाराज, जैनमुनी
R MUM NILESH JAIN MUNI PC LIVE 071225
आज पासून मी प्रत्येक टॉवर मध्ये जाणार आहे. आम्ही प्रत्येक वॉर्डात आता जसे गौरक्षक आहेत तसे कबूतर रक्षक तयार करत आहोत
बजरंग दल आणी विश्व हिंदू परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत ते कबूतर घेऊन येत असतात))
कबुतरांचा प्रश्न धर्माशी जोडण्याच्या नादात जैनमुनीना महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोय का असाही प्रश्न उपस्थित होतो.
हा प्रश्न राज ठाकरे सोडवू शकतात असा विश्वास त्यांनी महाकट्ट्यावर बोलून दाखवला होता
((बाईट- महाकट्टामधला चंक https://www.youtube.com/watch?v=BrSTVXfbvw0&t=141s 2.21 TO 3.41 पर्यंत, चांगला वाटला तर पूर्ण वापरणे नसेल तर योग्य ठिकाणी कट करणे))
जैनमुनी निलेशचंद्र महाराज यांच्या या वक्तव्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी हल्लाबोल केलाय. मुंबई महापालिकेच्या तोंडावर तोतया मुनी वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
<<WIN TEXT- 'तोतया मुनीची वादग्रस्त वक्तव्य'>>
((बाईट- अखिल चित्रे, शिवसेना
R MUM AKHIL CHITRE BYTE 071225
आता पालिकेच्या तोंडावर जाणिवपूर्वक मराठी विरुद्ध मारवाडी वाद पेटवण्यासाठी हा तोतया मुनी वक्तव्य करतोय .. जैन समाज मराठी माणस गुण्यागोविंदाने राहतात हे भाजपला पचत नाही म्हणून समाजात वाद निर्माण करण्यासाठी वारंवार प्रयत्न सुरू
निलेश मुनी आहेत राजकीय वाटचाल करण्यासाठी त्यांनी भाजपाकडून गळ्यात गमच्छा घालुन उतरावं राजकीय भाष्य धार्मिक गुरूच्या गादीवर बसुन करू नये))
जैन मुनी निलेशचंद्र महाराजांनी आता कबुतरांसाठी थेट आंदोलनाची हाक दिलीय.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद मुद्दाम पेटवला जातोय का असा सवाल मुंबईकर विचारत आहे.
मुंबईकरांचे, मग ते जैन असो की हिंदू, हिंदी असो की मराठी... रोजच्या जगण्याचे प्रश्न वेगळे आहेत.
कबुतरं, कबुतरखाने यांवरून वाद पेटवून खरंच समाजाचं भलं होणार आहे का याचा विचार जैनमुनींसह सर्वांनीच करण्याची गरज आहे.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows

































