Gaurav Khanna Bigg Boss 19 Winner Instagram Post: 'ते विचारत राहिले, जीके काय करेल? अन् मी...'; 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट
Gaurav Khanna Bigg Boss 19 Winner Instagram Post: सलमान खानने त्याच्या नेहमीच्या शैलीत दोन्ही फायनलिस्टचे हात धरले आणि शेवटी गौरवचा हात वर करून त्याला सीझनचा चॅम्पियन घोषित केलं.

Gaurav Khanna Bigg Boss 19 Winner Instagram Post: 'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) विजेता ठरला टेलिव्हिजनचा सुपरस्टार गौरव खन्ना (Television Superstar Gaurav Khanna). बिग बॉसच्या (Bigg Boss) संपूर्ण सीझनमधला गौरव खन्नाचा (Gaurav Khanna) प्रवास प्रचंड गाजला. सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेल्या या शोनं शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरलेली. अखेर सलमान खाननं गौरव खन्नाचं नाव घेताच, त्याच्या देशभरातली चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. सीझन जसजसा रंगात आला, तसतसा गौरव खन्ना, प्रणीत मोरे (Pranit More), फरहाना भट्ट (Farrhana Bhatt), अमाल मल्लिक (Amaal Mallik) हे काही स्पर्धक विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण, अखेर ट्रॉफीवर गौरव खन्नानं नाव कोरलं. सोशल मीडियावर गौरव खन्नावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच आता गौरवनं 'बिग बॉस 19'चं टायटल जिंकल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यापोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे.
गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट हे 'बिग बॉस 19'च्या ग्रँड फिनालेमध्ये टॉप दोन फायनलिस्ट म्हणून पोहोचले. सलमान खानने त्याच्या नेहमीच्या शैलीत दोन्ही फायनलिस्टचे हात धरले आणि शेवटी गौरवचा हात वर करून त्याला सीझनचा चॅम्पियन घोषित केलं.
अंतिम फेरीत, गौरव खन्नाला टॉप-2 फायनलिस्टमध्ये फरहाना भट्टपेक्षा जास्त मतं मिळाली आणि अशा प्रकारे सीझन 19 ची ट्रॉफी गौरवला मिळाला. याशिवाय, फरहाना भट्ट बिग बॉस 19 ची रनरअप होती. तर प्रणित मोरे तिसऱ्या स्थानावर होता. याशिवाय, तान्या मित्तल आणि अमाल मलिक चौथ्या आणि पाचव्या स्थानावर होते. अशाप्रकारे, सलमान खानचा बिग बॉस 19 च्या सीझनची सांगता झाली.
View this post on Instagram
'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर गौरव खन्ना काय म्हणाला?
तीन महिन्यांचा प्रवास अखेर संपलाय... आणि काय शेवट झालाय यार... ट्रॉफी घरी आली आहे... ते विचारत राहिले, "जीके काय करेल?"
आणि जसं आपण नेहमी म्हणतो की, जीके आपल्या सर्वांसाठी ट्रॉफी घरी आणेल... त्यानं अगदी तसंच केलंय. हा प्रवास अतिशय सुंदर पद्धतीनं जबरदस्त होता. आम्ही गौरवसोबत प्रत्येक दिवस प्रत्येक चढउतारावर, प्रत्येक अपयशावर, शक्ती आणि सन्मानाच्या प्रत्येक क्षणी जगलो आहोत... आणि आज, हा विजय वैयक्तिक वाटतोय...
हा विजय प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, ज्यानं त्याच्यावर विश्वास ठेवलाय, ज्यानं त्याला वोट्स केलेत, जे त्यांच्यासोबत उभे राहिलेत, ज्यानं त्याचं स्वप्न साकार केलंय...
आज, आपण फक्त ट्रॉफी साजरी करत नाही, आपण विश्वास, प्रेम आणि एकता साजरी करत आहोत... आपण एकत्र जिंकलोय... मनापासून खूप खूप धन्यवाद...
गौरव खन्नाला किती प्राईज मनी मिळालं?
गौरव खन्नानं 'बिग बॉस 19'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आणि आपल्या कारकिर्दीतील दुसरं टायटल आपल्या नावे केलं. या वर्षीच गौरवनं 'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया'चा किताब जिंकलेला. यासह, गौरव खन्नानं एका वर्षात दोन मोठे रिअॅलिटी शो जिंकून मोठा इतिहास रचला. 'बिग बॉस 19' जिंकल्याबद्दल गौरव खन्नाला चमकदार ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांचं प्राईज मनी मिळालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























