(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Army: देशातील पहिल्या महिला लढाऊ विमानचालक ठरल्या कॅप्टन अभिलाषा बराक; सेनाने केलं सन्मानित
First Woman Combat Aviator: भारताने तीन वर्षांपूर्वी संरक्षण सेवेत अधिकारी म्हणून महिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या तीन वर्षांनंतर कॅप्टन अभिलाषा बराक बुधवारी लष्कराच्या पहिल्या महिला लढाऊ पायलट बनल्या.
First Woman Combat Aviator: भारताने तीन वर्षांपूर्वी संरक्षण सेवेत अधिकारी म्हणून महिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या तीन वर्षांनंतर कॅप्टन अभिलाषा बराक बुधवारी लष्कराच्या पहिल्या महिला लढाऊ विमानचालक बनल्या. लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्समध्ये रुजू झाल्यामुळे आजचा दिवस लष्करासाठी ऐतिहासिक ठरला. आर्मी एव्हिएशन कॉर्प्समध्ये रुजू होण्यापूर्वी अभिलाषा या नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यात गुंतलेल्या होत्या. एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आज महिला विमानचालक म्हणून त्यांचा लष्करात समावेश करण्यात आला आहे.
बराक या मूळच्या हरियाणातील रहिवासी असून त्यांचे वडीलही सेनेत होते. बराक यांना सप्टेंबर 2018 मध्ये आर्मी एअर डिफेन्स कॉर्प्समध्ये नियुक्त करण्यात आले होते. लष्कराने सांगितले की, नाशिक येथील प्रशिक्षण शाळेत एका समारंभाच्या वेळी विमान वाहतूक महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते 36 वैमानिकांसह त्यांना 'विंग्स' या चिन्हाने सन्मानित करण्यात आले.
याबाबत माहिती देताना लष्कराच्या अधिकार्यांनी सांगितले की, बराक यांना 2072 आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रन सेकंड फ्लाइटसाठी नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलामध्ये महिला अधिकारी दीर्घकाळापासून हेलिकॉप्टर उडवत आहेत. याची सुरुवात लष्करात 2021 मध्ये झाली आहे.
नॅशनल डिफेन्स अकादमीने जून 2022 मध्ये महिला कॅडेट्सची पहिली तुकडी समाविष्ट करण्यास सहमती दर्शवली, तेव्हा बराक या लष्कराच्या पहिल्या महिला लढाऊ विमानचालक बनल्या. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये ऐतिहासिक आदेश देऊन महिलांसाठी अकादमीचे दरवाजे उघडले. सर्वोच्च न्यायालयानेही महिलांना लष्करात कायमस्वरूपी कमिशनसाठी पात्र मानले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Yasin Malik Convicted : फुटीरतावादी यासिन मलिकला अखेर जन्मठेप; NIA कोर्टाने सुनावली शिक्षा
Monsoon Update : श्रीलंकेच्या वेशीवर खोळंबलेला मान्सून पुढे सरकला; कोकण, विदर्भासह गोव्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज
Yasin Malik : यासिन मलिकला दोषी ठरवल्यानंतर पाकिस्तानचं पित्त खवळलं; शाहिद आफ्रिदी, अब्दुल बाशिद यांचे भारताविरोधात ट्वीट