Rajya Sabha Elections: 'या' नेत्यांना राज्यसभेवर पाठवू शकते काँग्रेस, सभागृहात वाढणार काँग्रेसच्या जागा?
Rajya Sabha Election 2022: पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला 11 जागा मिळू शकते. पी चिदंबरम आणि जयराम रमेश यांच्यासह अनेक नेते राज्यसभा निवडणुकीच्या शर्यतीत आहेत.
Rajya Sabha Election 2022: पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला 11 जागा मिळू शकते. पी चिदंबरम आणि जयराम रमेश यांच्यासह अनेक नेते राज्यसभा निवडणुकीच्या शर्यतीत आहेत. काँग्रेसला 11 जागा मिळाल्या तर त्यांच्या वरिष्ठ सभागृहातील सदस्यांची संख्या 33 होईल, जी सध्या 29 आहे. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला, अजय माकन आणि राजीव शुक्ला यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते राज्यसभेसाठी आशावादी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे
चिदंबरम (महाराष्ट्र), रमेश (कर्नाटक), अंबिका सोनी (पंजाब), विवेक तंखा (मध्य प्रदेश), प्रदीप टमटा (उत्तराखंड), कपिल सिब्बल (उत्तर प्रदेश) आणि छाया वर्मा (छत्तीसगड) यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. सिब्बल यांनी बुधवारी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने उत्तर प्रदेशमधून राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्जही दाखल केला. त्यांनी 16 मे रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
कोणत्या राज्यातून किती जागा?
सध्याच्या गणितानुसार काँग्रेसला राजस्थानमधून तीन, छत्तीसगडमधून दोन, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि मध्य प्रदेशमधून प्रत्येकी एक जागा मिळू शकते. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक आणि झारखंडमधील जेएमएमने प्रत्येकी एक जागा दिल्यास काँग्रेसला आणखी दोन जागा मिळू शकतात.
चिदंबरम यांना त्यांच्या गृहराज्यातून तामिळनाडूतून राज्यसभेत येण्याची आशा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांनी द्रमुक नेते आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचीही भेट घेतली आहे. मात्र राहुल गांधींची टीम काँग्रेसच्या डेटा अॅनालिसिस विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांना तामिळनाडूतून राज्यसभेवर पाठवण्यासाठी जोर देत असल्याचं सांगण्यात येत आहे. कर्नाटकमधून रमेश यांची उमेदवारी मंजूर झाल्यास त्यांची राज्यसभेतील ही चौथी टर्म असेल. तसेच सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटकचे राज्यसभेचे उमेदवार म्हणूनही पाहिले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Yasin Malik Convicted : फुटीरतावादी यासिन मलिकला अखेर जन्मठेप; NIA कोर्टाने सुनावली शिक्षा
Monsoon Update : श्रीलंकेच्या वेशीवर खोळंबलेला मान्सून पुढे सरकला; कोकण, विदर्भासह गोव्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज