(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Monsoon Update : श्रीलंकेच्या वेशीवर खोळंबलेला मान्सून पुढे सरकला; कोकण, विदर्भासह गोव्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज
Monsoon Alert : हवामान विभागाने पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून अलर्ट दिला आहे.
Monsoon Update : मान्सूनकडे (Monsoon Update) डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेले काही दिवस अरबी समुद्रात रेंगाळलेला मान्सून पुढे सरकलाय. मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यानं अरबी समुद्राचा आग्नेय आणि नैऋत्य भाग मान्सूननं जवळपास व्यापला आहे. मालदीव आणि कोरोरिन क्षेत्रात मान्सून सक्रीय झालाय.तसचं दक्षिण आणि इशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा हा प्रवास असाच सुरू राहिला तर पुढील आठवडाभरात मान्सून राज्याच्या वेशीवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
पुढील चार दिवस कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून अलर्ट
एकीकडे मान्सूनची आगेकूच पुन्हा सुरू झालेली असताना देशभरात मान्सूनपूर्व सरी धुमाकूळ घालण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. हवामान विभागाने पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून अलर्ट दिलाय. पश्चिमेकडे निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे देशातल्या बहुतेक राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
राज्यातही कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.
संबंधित बातम्या :
Heat Wave In India : पुढच्या वर्षी उन्हाचा तडाखा आणखी वाढणार, मार्चमध्येच उष्णतेची लाट येण्याची शक्यता
Monsoon News : अरबी समुद्रात मान्सून दाखल, 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज