काही करून भाजप सरकारला सत्तेवरून पायउतार करायचे आहे: केसीआर
KCR Nitish Kumar Attacks BJP: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी बुधवारी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार विकासकामांऐवजी केवळ प्रचार करण्यात गुंतले असल्याचा आरोप केला आहे.
KCR Nitish Kumar Attacks BJP: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी बुधवारी केंद्रातील भाजपच्या (BJP Government) नेतृत्वाखालील सरकार विकासकामांऐवजी केवळ प्रचार करण्यात गुंतले असल्याचा आरोप केला आहे. भाजपवर (BJP) हल्ला करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार संवेदनशील नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM K Chandrashekhar Rao) हे देखील मंचावर उपस्थित होते. नितीश कुमार यांनी कार्यक्रमादरम्यान चंद्रशेखर राव आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, तुम्ही एवढी मोठी कामे केलीत. पण तुमच्यावर कोणी टीका कशी करू शकते, हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे.
नितीश कुमार यांनी केसीआर यांची केली स्तुती
आंध्र प्रदेशातून वेगळे तेलंगणा राज्य निर्माण करण्याच्या राव यांच्या प्रयत्नांचा संदर्भ देत नितीश कुमार म्हणाले की, राव तेलंगणाच्या निर्मितीसाठी 2001 पासून लढत होते. आज लोक काहीही बोलतात, पण तुम्ही तेलंगणाला वेगळे राज्य दिले. मग तिथली जनता तुमची बाजू कशी सोडणार.
नरेंद्र मोदी सरकारने बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी मान्य न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करून नितीश कुमार म्हणाले की, ज्यांना काही काम करायचे नसते, ते फक्त प्रचार करतात. ते म्हणाले, आता केंद्राकडून राज्यांना मिळणारी रक्कम कमी होत आहे. आधी राज्याला जितके पैसे मिळत होते. तितकेही आता मिळत नाही.
केसीआर यांनी भाजपला केलं लक्ष्य
पत्रकारांशी संवाद साधताना केसीआर म्हणाले की, देशाची स्थिती वाईट आहे. देशात चार लाख मेगा वॅट विजेची उपलब्धी आहे. तरीही विजेसाठी तळमळ करावी लागत आहे. देशाची अर्थव्यवस्था घसरली आहे, कर्ज वाढले आहे. ते म्हणाले की, सरकार विरोधकांशी चर्चा करत नाही. लोकांना पिण्याचे पाणीही देऊ शकत नाही. देशाची राजधानी दिल्लीतही पुरेसे पाणी नाही. लोकांना 24 तास वीज मिळत नाही. त्यांची क्षमता किती आहे, हे देशासमोर आले आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे.
ते म्हणाले की, धर्माच्या नावावर देश तोडणे हा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे आज नितीशजींची भेट घेतल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपमुक्त भारतचा नारा द्यावा. चंद्रशेखर राव पुढे म्हणाले की, या देशाला भाजपपासून धोका आहे, हे समजून घ्या. नितीश कुमार हे देशातील सर्वोत्कृष्ट नेते आहेत. काही करून भाजप सरकारला सत्तेवरून पायउतार करावेत लागेल.