लोकसभा निवडणुकीत पराभव, भाजप नेते प्रताप पाटील चिखलीकर नाराज, माजी मंत्री भागवत कराड यांचा गौप्यस्फोट
Bhagwat Karad on Prataprao Chikhalikar : "नांदेडचे भाजपा माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या अनेक कार्यक्रमात चिखलीकर अनुपस्थित असतात."
Bhagwat Karad on Prataprao Chikhalikar : "नांदेडचे भाजपा माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या अनेक कार्यक्रमात चिखलीकर अनुपस्थित असतात. लोकसभा निवडणुकीत यशस्वी न झाल्याने ते नाराज असतील, पण ते पक्ष संघटनेसोबत आहेत. माझी त्यांची भेट झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत ते पक्षासाठी काम करतील", असा विश्वास माजी केंद्रिय राज्य मंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केला .
वरिष्ठांकडून जे आदेश देतील याचं आम्ही पालन करु
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून कोण किती जागा लढवणार याचा निर्णय पक्ष नेते घेणार आहेत. वरिष्ठांकडून जे आदेश देतील याचं आम्ही पालन करु अशी प्रतिक्रिया माजी केंद्रिय राज्य मंत्री भागवत कराड यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक कराड यांनी आज नांदेड मध्ये घेतली. जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार घेतील. त्यांचा आदेशाचे तिन्ही पक्षातील कार्यकर्ते पालन करतील आणि राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल असंही कराड म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपसह महायुतीला फारसं यश मिळवता आलं नाही. 48 मतदारसंघापैकी महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. कारण लोकसभा निवडणुकीआधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर अशोक चव्हाणांना भाजपाने राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा भाजपा मोठ्या मताधिक्याने जिंकेल अशी चर्चा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव झाला. तर काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांचा विजय झाला.
अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये आले. त्यांच्या नेतृत्वात नांदेड लोकसभेची निवडणूक मी लढवली. त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात जो फॅक्टर झाला तोच फॅक्टर नांदेडमध्येही झाला. त्यामुळे माझा पराभव झाला. पाच वर्ष काम करत असताना माझ्याकडूनही काही चुका झाल्या, त्या चुकांची उजळणी करण्याआधी मी कुठे कमी पडलो, याबाबत आत्मपरिक्षण करणार, अशी प्रतिक्रिया चिखलीकर यांनी पराभव झाल्यानंतर दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
हर्षवर्धन पाटील राज्यातील मोठे नेते, भाजपवाले अपमानास्पद बोलत असतील तर हे दुर्दैवी : सुप्रिया सुळे