Ajit Pawar : कांदा निर्यात बंदीची मोठी किंमत मोजावी लागली, काहीही करा, पण निर्यात बंदी करु नका,अजितदादांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी
Ajit Pawar, Mumbai : "विरोधक घाबरलेले आहेत, त्यांनी काहीही आरोप केले तरी आपण विकासावरच बोलायचं. कांद्या निर्यात बंदीच मोठी किंमत मोजावी लागली, काहीही करा, पण निर्यात बंदी करु नका"
Ajit Pawar, Mumbai : "विरोधक घाबरलेले आहेत, त्यांनी काहीही आरोप केले तरी आपण विकासावरच बोलायचं. कांद्या निर्यात बंदीच मोठी किंमत मोजावी लागली, काहीही करा, पण निर्यात बंदी करु नका", अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. शासकीय योजना व त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात राज्यस्तरीय महायुती पदाधिकारी बैठक षन्मुखानंद सभागृह, मुंबई येथे पार पडली. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात आपल्याला अंदाज व्यक्त करत होतो, तसं यश मिळालं नाही. इतर राज्यात यश मिळालं, त्यामुळे देशात एनडीएचं सरकार आलं. त्याबद्दल मी नरेंद्र मोदींचं अभिनंदन करतो.
अजित पवारांच्या भाषणातील मुद्दे
अनेक लोक हिताचे निर्णय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
लोकसभेच्या निवडणुका झाल्या आपण जो अंदाज व्यक्त केला तो पूर्ण करता आला नाही.
आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही.
पण देशात तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले.
मागील 10 वर्ष मोदींनी देशाचा विकास केला.
मोदींनी देशाचे नाव लौकीक करण्याचे काम केले.
विरोधकांना राज्यात जास्तीचे यश मिळाले.
विरोधकांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला.
संविधानाला आदराचे स्थान मोदींनी दिले.
जाणीवपूर्वक संविधान बदलल जाणार असा प्रचार विरोधकांनी केला
या राज्यात तसा प्रचार झाला आणि फटका बसला.
काही समाजाच्या मनात भीती निर्माण झाली.
आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही.
त्यांच्याकडून जो प्रचार केला गेला तो आपण हाणून पाडलं पाहिजे.
- विभागनिहाय, जिल्हानिहाय, तालुकानिहाय समन्वय साधण्याचं ठरवलं होतं प ते झालं नाही
- महायुतीत समन्वय राखण्यात अपयश आल्याची अजित पवारांची जाहीर कबुली
- आता समन्वय राखण्यासाठी लगेच कामाला लागू
- अजितदादांचे फडणवीस शिंदेंनी आवाहन
- ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी समन्वयाने काम करण्याची भूमिका घ्यावी
- अजितदादांचे महायुतीतील इच्छूकांना आवाहन
- विरोधकांनी नरेटिव्ह पसरविला तर त्याला जबरदस्त Counter attack द्यावा लागेल
- सोशल मीडिया स्ट्रॉंग करावा लागेल
- अजितदादांकडून महाराष्ट्राचा उल्लेख शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र
- विरोधक घाबरलेले आहेत, त्यांनी काहीही आरोप केले तरी आपण विकासावरच बोलायचं
- काहीही करा पण कांदा निर्याय बंदी करु नाका
- अजितदादांची पियुष गोयल यांच्याकडे जाहीर व्यासपीठावर मागणी
- कांदा निर्यात बंदीची मोठी किंमत मोजावी लागली - अजित पवार
- महायुतीची बदनामी टाळा
- जो बदनामी करेल त्याच्यावर कारवाई करणार
- अजित पवारांचा महायुतीतील बंडखोरांना इशारा
इतर महत्वाच्या बातम्या