एक्स्प्लोर

सुप्रियाताईंना घाणेरड्या शिव्या दिल्या, पालकमंत्री बनवलं, मंत्रिमंडळातून लाथ मारुन काढून टाकायला पाहिजे होतं, आदित्य ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्ला

Aaditya Thackeray on Abdul Sattar, छत्रपती संभाजीनगर : "एकजण आहेत, त्यांना इथे (छत्रपती संभाजीनगर) पालकमंत्री बनवले. त्यांचं गद्दार आडनाव आहे काय? त्या व्यक्तीने सुप्रिया सुळेंना चॅनेलवर घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या."

Aaditya Thackeray on Abdul Sattar, छत्रपती संभाजीनगर : "एकजण आहेत, त्यांना इथे (छत्रपती संभाजीनगर) पालकमंत्री बनवले. त्यांचं गद्दार आडनाव आहे काय? त्या व्यक्तीने सुप्रिया सुळेंना चॅनेलवर घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या. तुम्ही एक वेळ मनातून काढून टाका की, सुप्रियाताई राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत किंवा खासदार आहेत. जी व्यक्ती, जो मंत्री कोणालाही शिवीगाळ करु शकतो. त्या मंत्र्याला लाथ मारुन काढून टाकायला पाहिजे होतं. गेट आऊट सांगायला पाहिजे होतं. त्यांना तुम्ही पालकमंत्री म्हणवता. छत्रपती संभाजीनगरच्या डोक्यावरती बसवलेलं आहे. असे लोक तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का?", असे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगरमधील महाराष्ट्र स्वाभिमान सभेत बोलत होते. 

किती वाईन शॉप परवाने मिळतील सांगता येत नाही

आदित्य ठाकरे म्हणाले, आपल्याकडे निवडणूक उशिरा होत आहे. आज इथलं विमानतळ बंद होतं, म्हणून उशीर झाला आहे. लोकसभा आधीच आणि नंतरचे चित्र बदलले आहे. आत्ताचे संभाजीनगरमध्ये जे खासदार निवडून आले त्यांना किती वाईन शॉप परवाने मिळतील सांगता येत नाही. भाजपला संविधान बदलायचं होतं ही खरी परिस्थिती आहे. भाजपच्या नेत्याने मला सांगितले होते, 300 जागा आल्यावर संविधान बदलणार आहे. या देशात कुणीच खुश नाही. महाराष्ट्रात शेतकरी खुश नव्हते, महिला सुरक्षितता वाटत नाही. सर्वच नागरिकांना वाटत होते संविधान धोक्यात आले आहे. गद्दार पळून गेले त्यांची थोडीफार तरकी झाली असेल. कुणाला 72 व्या मजल्यावर घर मिळालं.

मुंबई विद्यापीठामध्ये निवडणूक लढवण्याची यांची हिंमत नाही

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, कुणाला गाड्या आणि कुणाला टोल नाका मिळाला. 50 खोक्या वाल्यांची जी प्रगती झाली ती महाराष्ट्राची झाली नाही. हे सरकार घटनाबाह्य आहे. न्यायालयाचा निकाल आल्यावर, 40 चोर बाद झाल्यावर हे सरकार घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट होईल. महानगरपालिका निवडणूक होत नाही. कुठेही महापौर नाही हे घाबरतात. मुख्यमंत्री ते कॉन्ट्रॅक्टर मंत्री असेच झाले आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये निवडणूक लढवण्याची यांची हिंमत नाही. महाराष्ट्राची अस्मिता दाबली जात आहे. ऑरीक सिटीसाठी आपण तुफान काम केलं आहे. जे उद्योग येत आहे ते जात आहेत. महाविकास आघाडीने उद्योग आणले. राज्याचे उद्योगमंत्री यांचे उद्योग कुठे सुरू आहे कुणाला माहित नाही.

गुजरातमधून ड्रग्स येत आहे आणि उद्योग गुजरातला जात आहे. आज मिंदे साहेब आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना विचारतो काल मर्सडीजवर छापा टाकला त्यावर खुलासा करा. यांना ही कंपनी गुजरातला घेऊन जाणार आहे. निवडणुकीत हे आपल्याला विकत घेण्याचा प्रयत्न करतील. सर्व काही गुजरातला पाठवले जात आहे,माझ्या हक्काचं पळवून जात असेल तर मी लढणारच आहे. एक घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे आणि दोन हाप डीसीएम आहे, असंही ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांना 15 रुपयांचे चेक आल्यास नवल वाटू नये

बलात्कारीचा सत्कार करणारा भाजप तुमचा भाऊ होऊ शकतो का?. कालच आंदोलन राजकीय नव्हतं. कोशारी भाजपपाल होते. 15 लाखांवरून 1500 वर आले. पुढे मागचे दोन शून्य देखील काढतील. शेतकऱ्यांना 15 रुपयांचे चेक आल्यास नवल वाटू नये. शेतकऱ्यांना एकदा फसवून झाल्यावर आता महिलांना फसवतात की काय?  बदलापूरला 6 तास एफआयआर घेतली नाही. बदला नाही तर बदलावं आणायचा असेल तर आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. घटनाबाह्य यांची शेती जबरदस्त आहे, फक्त दोन दिवस ते जातात. तीन तीन हेलिकॉप्टर त्यांच्या शेतात चालतात, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Indrayani Rever : पुलावरुन मित्राला फोन लावला अन् जीवन संपवणार म्हणत महिला पोलिसाची थेट इंद्रायणी नदीत उडी

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
Embed widget