एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Parbhani : शिक्षकाचे शाळकरी मुलींसोबत गैरवर्तन, प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी शिक्षकाला दिला कपडे फाटेपर्यंत चोप

Parbhani News : परभणीत  शिक्षकानेच विद्यार्थिनींबरोबर गैरवर्तन केल्याने संतप्त पालकांनी या शिक्षकाला कपडे फाटेपर्यंत चांगला चोप दिला आहे.

 परभणी : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यानंतर आता परभणीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा लावणाऱ्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. परभणीत  शिक्षकानेच विद्यार्थिनींबरोबर गैरवर्तन केल्याने संतप्त पालकांनी या शिक्षकाला कपडे फाटेपर्यंत चांगला चोप दिला आहे. दरम्यान या प्रकरणाची प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी दखल घेतली असून या शिक्षकावर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक असलेले बी.यु रुद्रवार हे या शाळेतील तीन विद्यार्थिनी बरोबर सातत्याने गैरवर्तन करत होते. या गैरवर्तनाला कंटाळून या मुलींनी सदर शिक्षकाची पालकांकडे तक्रार केली आणि पालकांचा राग अनावर झाला. या रागातून पालकांनी या शिक्षकाला चांगला चोप दिलाय.कपडे फाटेपर्यंत या शिक्षकाला पालकांनी चोपले आहे. परभणीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर दिवसभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या

दरम्यान हे प्रकरण कळल्यानंतर गंगाखेडच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांपासून प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी घेत थेट शाळेवर जाऊन या प्रकरणाची चौकशी केली.पालक,विद्यार्थी, शाळेतील इतर शिक्षक, शिक्षिका यांच्याशी बातचीत करून चौकशी केली असून उद्या संध्याकाळपर्यंत या शिक्षकावर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी सांगितले आहे..

तसेच याआधी इतर मुलींशी या नराधम शिक्षकाने गैरवर्तन केले का याचा तपास करत आहेत. शिक्षकाच्या या कृत्याने शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषदेतील शाळेतील या प्रकारामुळे पालकवर्गात तीव्र संतापाची लाट असून या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात आणखी एका पक्षात फूट पडणार? भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, नेत्यानं खदखद जाहीरपणे मांडली
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप, भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, न्याय मिळत नसल्यानं नेत्याकडून खदखद
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 6.30 AM 09 October 2024ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 7 AM 09 October 2024Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रात आणखी एका पक्षात फूट पडणार? भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, नेत्यानं खदखद जाहीरपणे मांडली
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप, भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, न्याय मिळत नसल्यानं नेत्याकडून खदखद
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
Embed widget