Padma Awards 2021: अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना सामाजिक कार्यासाठी 'पद्मश्री' घोषित
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना यांना भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई : ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना यांना भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या ही लोककला जपून समाजामध्ये जनजागृती आणि प्रभोधन केल्यामुळे गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. गंगावणे यांच्यासह 102 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
Padma Awards 2021: पद्म पुरस्कारांची घोषणा, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंसह 7 जणांना पद्मविभूषण
आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे. सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणतात. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी.
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
पद्मविभूषण पुरस्कार (7) शिंजो आबे एस पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर) डॉ. बेले मोनप्पा नरेंद्र सिंह कॅम्पनी (मरणोत्तर) मौलाना वाहिद्दुद्दीन खान बी.बी लाल सुदर्शन साहू
पद्मभूषण (10) कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा तरुण गोगोई (मरणोत्तर) चंद्रशेखर कांबरा सुमित्रा महाजन नृपेंद्र मिश्रा रामविलास पासवान (मरणोत्तर) केशूभाई पटेल (मरणोत्तर) कालबे सादिक (मरणोत्तर) रजनीकांत श्रॉफ तारलोचन सिंह