एक्स्प्लोर
Advertisement
अवैध गर्भपात प्रकरण : डॉ. वर्षा लहाडेंवर अखेर गुन्हा दाखल
नाशिक : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी 23 दिवसांनंतर अखेर डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात 22 मार्च रोजी एका महिलेचा 24 आठवड्यांचा स्त्री गर्भाचा अवैधरित्या गर्भपात करण्यात आल्याचं प्रकरण उजेडात आलं होतं. यामुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.
डॉ. लहाडेंच्या म्हसरुळ येथील ‘प्रयाग’ या खाजगी हॉस्पिटलची राज्यस्तरीय आरोग्य समितीमार्फत झडती घेण्यात आली. त्यानंतर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मागील आठवड्यात म्हसरूळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, जिल्हा रुग्णालयातील गर्भपात प्रकरणी कुठलीच कारवाई करण्यात न आल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
अखेर काल रात्री उशिरा महापालिकेचे आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनला गर्भपात अधिनियम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी डॉकटर वर्षा लहाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाच आठवड्यात डॉ. लहाडे यांच्यावर 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून, जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रकरणात अजून काही लोकांवर गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement