एक्स्प्लोर

Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत, आता चार वर्षाच्या मुलीचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू

Nashik : नाशिक शहरासह जिल्ह्यात पशुधनासह मानवी वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत.

Nashik Latest News Update : नाशिक शहरासह जिल्ह्यात पशुधनासह मानवी वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. यात बहुतांश बालकांचा आपला जीव गमवावा लागत असल्याचे चित्र आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुन्हा एका चार वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काही दिवसांपूर्वी याच भागातील वेळुंजे परिसरात आठ वर्षीय मुलाचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेला काही महिनेच उलटले नाहीत तोच पुन्हा वेळुंजे परिसरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या ब्राह्मणवाडे गावानजीक वस्तीवर बिबट्याने हल्ला चढविला आहे. नयना नवसु कोरडे असे या बालिकेचे नाव आहे. आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नाशिक जिल्ह्यात (Nashik ) निफाड, देवळा, इगतपुरी, दिंडोरी आदी परिसरात बिबट्याचा वावर आहे. मात्र आता बिबट्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यात आपला मोर्चा वळवल्याचे या घटनावरून दिसून येते. जुलै 2022 तालुक्यातील धुमोडी परिसरात आठ वर्षीय मुलगी बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर याच परिसरातील वेळुंजे गावानजीक असलेल्या दिवटे वस्तीजवळ बिबट हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ब्राह्मणवाडे परिसरात बिबट्याने चार वर्षीय मुलीची शिकार केली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राम्हणवाडे गावातील मळे परिसरात सायंकाळच्या सुमारास मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना तसेच परिसरात अंधार असल्याचा फायदा घेत बिबट्याने चार वर्षीय मुलीवर झडप घातली. तिला बिबट्याने जबड्यात धरून फरफटत नेत जंगलात पळ काढला. स्थानिकांच्या  ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना माहिती दिली. तसेच घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. वनरक्षक, वन मजुरांसह गावकऱ्यांचे शोध कार्य सुरू असताना काही अंतरावर मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. 

दरम्यान वेळुंजेसह ब्राम्हणवाडे, धुमोडी हा संपूर्ण जंगल परिसर आहे. येथील पूर्णतः जंगल व्याप्त असल्याने बिबट्याचा अधिवास क्षेत्र बनले आहे. मात्र हळूहळू भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या गावात वावर वाढू लागला आहे. पशुधनावर हल्ला करून शिकार करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र हल्ली लहान मुलांवरही हल्ले होत असल्याने ब्राम्हणवाडे, वेळुंजेसह धुमोडी पंचक्रोशीत दहशत पसरली असून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget