Nashik Grampanchayat Election : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना धक्का, दहा वर्षांनंतर ठाकरे गटाचा सरपंच
Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) ग्रामपंचायती धक्कादायक निकाल हाती आला आहे.
Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) ग्रामपंचायती धक्कादायक निकाल हाती आला आहे. निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवारांचे निकटवर्तीय दिलीप बनकर (Dilip Bankar) यांना धक्का बसला असून पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीवरील दहा वर्षांची सत्ता गमावली आहे. तर या ग्रामपंचायतीवर थेट सरपंच पदी ठाकरे गटाचे भास्कर बनकर विजयी झाले आहेत.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सात तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक (Grampanchayat Election) निकाल घोषित होत असून आतापर्यत काही ग्रामपंचायतींचा निकाल (Grampanchayat Election Result) हाती आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात भाजपाची (बीज P) सरशी असून त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे घड्याळ सुसाट आहे. तर त्यांनतर अनुक्रमे शिवसेना (Shivsena), शिंदे गट आणि काँग्रेस असल्याचे चित्र आहे. अद्याप संपूर्ण निकाल येणे बाकी असून जिल्ह्यातील एक एक ग्रामपंचायतीचे निकाल हाती येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला असून दिलीप बनकर याना धक्का बसला आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार तथा अजित पवारांचे निकटवर्तीय दिलीप बनकर यांच्या पुतण्याचा पराभव झाला आहे. नाशिक जिल्ह्यात प्रतिष्ठेची ठरलेल्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीवरील दहा वर्षांची सत्ता गमावली बनकरांनी गमावली आहे. या ग्रामपंचायतीवर थेट सरपंच पदी ठाकरे गटाचे भास्कर बनकर विजयी झाले आहेत. यापैकी ठाकरे गटातील भास्कर बनकर यांना 8 हजार 335 मते पडली तर राष्ट्रवादीचे गणेश बनकर यांना सहा हजार मतांवर समाधान मानावे लागले. तर दुसरीकडे भाजप उमेदवार असलेल्या सतीश मोरे यांना 8 हजार 122 मते पडली. म्हणजेच भाजपच्या उमेदवाराने ठाकरे गटाच्या उमेदवाराला चांगली टशन दिल्याचे आकडेवारीवरून दिऊन येते.
नाशिक जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायत 196 पैकी 08 ग्रामपंचायत बिनविरोध आहेत. दरम्यान आज सकाळपासून एक एक ग्रामपंचायत निकाल हाती येत असून आतापर्यतच्या निकालानुसार भाजप -21 जागांवर विजयी, शिंदे गट -14, ठाकरे गट - 12, राष्ट्रवादी काँग्रेस - 15, काँग्रेस - 3, मनसे - ००, इतर पक्षांना 05 जागांवर विजय मिळवला आहे. नाशिक जिल्ह्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या मालेगाव तालुक्यातील पहिला निकाल हाती येत आला असून शिंदे गटाचे मंत्री दादा भूसेंच्या मालेगावमध्ये भाजपने खाते उघडले आहे. चौकट पाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपचे समाधान पवार विजयी झाले आहेत. तर सटाणा तालुक्यातील मतमोजणी संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.