Nashik Gram Panchayat Election Result 2022 : नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतीचा निकाल एका क्लिकवर, पहा निकालाचे अपडेट
Gram Panchayat Election Results 2022 LIVE Updates: नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Nashik Gram Panchayat Election Result 2022 Live : नाशिकमध्ये (Nashik) थोड्याच वेळात संबंधित तहसील कार्यलयात (Tahsil Office) 10 वाजता मतमोजणीला (Counting) सुरवात होणार आहे. नाशिक तहसील कार्यालयात 13 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. अर्धा तासात पहिला निकाल हाती लागणार असून सर्वच ठिकाणी मतमोजणी केंद्रा बाहेर चोख पोलीस बंदोबस्त (Police Security) तैनात करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) 14 तालुक्यांतील 188 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पडली. आज रिंगणात असलेल्या 3 हजार 474 उमेदवारांचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. आज सकाळपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात ओट असून पहिला निकाल अर्धा तासात हाती येणार आहे. त्यामुळे मतपेटीत भवितव्य बंद झालेल्या हजरो उमेदवारांच्या मनात धाकधूक आहे. तर दुसरीकडे आतापासूनच कार्यकर्ते, नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळतो आहे.नाशिक जिल्ह्यात रविवारी मतदानाही टक्केवारी घसरल्याचे दिसून आले. कारण जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतसाठी 79.63 टक्के मतदान झाले.
दरम्यान आज मतमोजणीचा कार्यक्रम संबंधित तहसील कार्यालयात सुरु आहे. तर नाशिक तालुका तहसील कार्यालयात 13 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. शिवाय पुढील अर्धा तासात पहिला निकाल हाती लागणार असून सर्वच ठिकाणी मतमोजणी केंद्रा बाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई, उमराळे, डांगसौंदाणे यासह अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती असल्याने पोलीस यंत्रणेने अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली असून संवेदनशील गावांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात 34 पैकी नारायणगाव ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. आहे. एकूण 8 फेरी होणार दुपारी दोन वाजेपावेतो सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
Nashik Grampanchayat : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचं घड्याळ एक नंबरवर, सर्व जागांचा निकाल जाहीर, कुणाला किती जागा!
Nashik Grampanchayat : अवघ्या नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, त्या पाठोपाठ भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलय तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा अधिक जागा पदरात पाडून घेतल्या आहेत, छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य संघटनेन चंचू प्रवेश करत 3 जागी संघटनेचा भगवा फडकविला आहे.
Nashik Grampanchayat : नांदगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचातींचा निकाल, शिंदे गटाची सरशी
Nashik Grampanchayat : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल लागला असून यामध्ये लक्ष्मीनगर मीराबाई शंकर उगले (शिंदे गट), धोटने ग्रामपंचायत शरद अशोक काळे (शिंदे गट), भार्डी अनिता अशोक मार्कड (राष्ट्रवादी काँग्रेस), हिरेनगर मंगल श्रावण बिंनर (शिदे गट), बोयेगाव बबन पोपट शेरमळे (शिंदे गट), लोढरे ज्योती प्रमोद निकम (शिंदे गट) असे विजयी उमेदवार आहेत. अद्यापही दहा ग्रामपंचायतींचा निकाल बाकी असल्याचे समजते.
























