Nashik Rohit Pawar : वंचित बहुजन आघाडीबद्दल आमदार रोहित पवार यांचे सूचक विधान, म्हणाले...
Nashik Rohit Pawar : नाशिकमध्ये आमदार रोहित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीवर गंभीर आरोप केला आहे.
Nashik Rohit Pawar : कसबा पोटनिवडणुकीत (Pune Bypoll Election) भाजपने किती आर्थिक ताकद लावली आहे? भाजपच्या (BJP) काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले..सर्व महत्त्वाचे नेते तिथे व्यस्त आहे. निधीचा वापर मतांचे विभाजन करण्यासाठी होतो आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडी अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत करत असल्याची जोरदार टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.
नाशिकमध्ये (Nashik) आज आमदार रोहित पवार यांनी युवकांशी संवाद साधला. महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या (Maharashtra Vision Forum) माध्यमातून ते महाराष्ट्रातील विविध शहरात जाऊन विद्यार्थ्यांशी बोलत आहेत. दरम्यान नाशिकच्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर (Vanchit Bahujan Aaghadi) गंभीर आरोप केला आहे. यावेळी ते म्हणाले कि, कसबा पोटनिवडणुकीत भाजप पैशाचा वापर करतंय असा आरोप करण्यात येत आहे. या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले कि, लोकांमध्ये तशा चर्चा आहे..भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले..भाजपने किती आर्थिक ताकद लावली आहे? सर्व महत्त्वाचे नेते तिथे व्यस्त आहे. निधीचा वापर मतांचे विभाजन करण्यासाठी होतो असल्याचे ते म्हणाले.
तसेच वंचित बहुजन आघाडी अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत करत आहे..विकास कुणी केला, हे लोकांना माहीत आहे. सध्या गुंडागर्दी सुरू आहे. लोकं विकासाच्या बाजूने निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे..राजकारण, सरकारचे निर्णय आणि निवडणुका याचे योगायोगाने टायमिंग साधलं जात आहे. चिंचवडच्या निवडणुकीत जे अपक्ष उमेदवार उभे आहे, त्यांच्याकडे किती खोके आले, हा प्रश्न आहे..लोकं हे विकास आणि माणूस यावर मत देतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता...
देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना ते म्हणाले कि, ते आज काय बोलतील आणि उद्या काय बोलतील, हे राजकारणाची परिस्थिती यावर अवलंबून असते. विधान परिषद निवडणुकीत भाजपची जी परिस्थिती झाली आहे, त्यावरून लोकं त्यांच्या विरोधात आहे, असं वाटतं..शिवाय पहाटेच्या शपथविधीवरून राजकारण सुरू आहे..भाजपकडून सहानुभूती मिळवण्यासाठी राजकारण सुरु असून आज लोकांना काय पाहिजे, यावर चर्चा करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले कि, निवडणुका कधी लागतील, हे मला माहीत नाही..लोकांच्या विरोधानंतर राज्यपालांना बदलण्यात आले..येत्या काही महिन्यात राष्ट्रपती राजवट राज्यावर लागू शकते का, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे..भाजपा स्वतःकडे पॉवर ठेवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता आहे..पण येत्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट होईल, हे लोकांचे मत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे..नवीन राज्यपाल आल्याने राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असल्याचे पवार म्हणाले.