एक्स्प्लोर

Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल

Maharashtra Assembly Elections 2024 : आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात. नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

अहिल्यानगर : आता आम्हाला संगमनेरसोबत राहाता तालुका देखील बदलायचा आहे. लोक म्हणतात आता ते खूप चांगले वागतात. आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात. नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता, असे म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राधाकृष्ण विखे पाटलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी कोल्हार गावात सभा सभा पार पडली. या सभेतून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी साधला विखे पिता पुत्रांवर निशाणा साधला. 

बाळासाहेब थोरात म्हणाले की, आजच्या सभेला कुणाला बोलावलं, बस भरून आणल्या, खाटुक खुटुक ठेवलं असं काही नाही. आजची उत्स्फूर्त सभा आहे, अशी सभा विजयाची असते. बाजार समिती निवडणुकीच्या वेळी कोल्हारमध्ये भगवती मातेच्या दर्शनाला आलो होतो. तेव्हा म्हणालो होतो मी पुन्हा येणार, पुन्हा येणार आणि खरंच पुन्हा आलो. गणेश कारखाना निवडणुकीच्या वेळी देखील दर्शन घेऊन गेलो होतो. लोकसभेचा प्रचार सुरू असताना सुद्धा देवीचे आशिर्वाद घेऊन गेलो होतो. आताही आशिर्वाद घेतले आहेत. भगवती माता ही लढाईची देवता आहे. 

माझे विरोधक देखील म्हणतात तो वाईट बोलला 

ते (विखे) आता संगमनेर तालुक्यात फिरताय. मध्यंतरी काय उद्योग करून ठेवले? हे जिथे जातात तिथे दुष्ट बुध्दी सुचते. त्या गड्याला वान नाही पण गुण लागला. वाईट बोलल्यावर दहा पंधरा मिनिटात महिला मंडळ स्टेजवर आलं. गाव उठून आलं. मात्र याचा अर्थ ते सगळे आमचे होते असे नाही. माझे विरोधक देखील म्हणतात तो वाईट बोलला ते चुकीचे आहे. अख्खा तालुका उठला. 15 मिनिटात सगळे रस्ते बंद केले. पळता भुई थोडी झाली. कुपाटी कुपाटीने पळाले. दुसऱ्या दिवशी काटे काढत होता, असे म्हणत बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली. 

नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता

संगमनेर तालुका मोडून काढला तर तुलना करायला कुणी राहणार नाही. म्हणून संगमनेर मोडायला निघाले. मी पुन्हा म्हणतोय एकदा राहाता आणि संगमनेर अशी तुलना होऊन जाऊद्या. आम्ही सरसच राहु. आता आम्हाला संगमनेर सोबत राहाता तालुका देखील बदलायचा आहे. लोक म्हणतात आता ते (विखे) खूप चांगले वागतात. आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात. नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता. गणेश कारखाना आणि राहुरी कारखान्याची वाट लावली. दूध संघाचा सपाटा झाला. मात्र दिल्लीत गेलं की, महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्रातलं सर्वात मोठं व्यक्तिमत्त्व म्हणजे हे आहेत, असा उपरोधिक टोला देखील बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला. 

आणखी वाचा 

Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget